बारावी पुरवणी परीक्षा; ३० मेपासून आॅनलाइन अर्ज

By admin | Published: May 28, 2016 01:29 AM2016-05-28T01:29:20+5:302016-05-28T01:29:20+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मेपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

12th Supplementary examination; Online application from 30th May | बारावी पुरवणी परीक्षा; ३० मेपासून आॅनलाइन अर्ज

बारावी पुरवणी परीक्षा; ३० मेपासून आॅनलाइन अर्ज

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मेपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ९ जूनपर्यंत असणार आहे.
मंडळामार्फत यंदापासून बारावीची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ३० मे ते ९ जून या कालावधीत आॅनलाइन अर्ज भरता येतील. तर विलंब शुल्क भरून १३ जूनपर्यंत अर्ज करता येतील. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै २०१६ व फेब्रुवारी-मार्च २०१७ अशा दोन संधी उपलब्ध राहतील, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

Web Title: 12th Supplementary examination; Online application from 30th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.