१३ कोटीचे अनुदान प्रलंबित
By admin | Published: March 9, 2015 02:06 AM2015-03-09T02:06:18+5:302015-03-09T02:06:18+5:30
खामगाव तालुक्यातील सुक्ष्म सिंचनाचा लाभ घेणारे शेतकरी त्रस्त.
गिरीश राऊत /खामगाव (जि. बुलडाणा): ठिबक संच तसेच तुषार संचासाठी शासनाने अनुदान जाहीर केले, मात्र दोन वर्षे उलटत असतानाही तालुक्यातील सुमारे २१५१ शेतकर्यांचे एकूण १३ कोटी ८0 लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळावा म्हणून ठिबक व तुषार संच खरेदी करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत तसेच यामुळे या योजनेप्रति अनास्था निर्माण होत आहे.
शासनाने अशा सूक्ष्म सिंचनासाठी ७५ टक्के अनुदान शेतकर्यांना जाहीर केले आहे. त्यामुळे ठिबक संच खरेदी करणार्या २१५१ शेतकर्यांनी अनुदानाचे प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केले, मात्र या पैकी फक्त ३६६ शेतकर्यांना अनुदान देण्यात आले. यातील ८१0 प्रकरणांचीच क्षेत्रीय तपासणी पूर्ण झाली असून, ९७५ शेतकर्यांच्या प्रकरणांची क्षेत्रीय तपासणी बाकी आहे. दोन वर्षे उलटत अस तानाही तालुक्यातील शेतकर्यांचे एकूण १३ कोटी ८0 लाख रुपयांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकर्यांना अशा दुष्काळी परिस्थितीत अनुदान मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे. ही प्र तीक्षा जास्त लांबू नये, अशी या शेतकर्यांची अपेक्षा आहे.
तालुका कृषी अधिकारी एम. बी. जाधव यांनी शेतकर्यांना प्रलंबित अनुदान तातडीने देण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगीतले. प्रलंबित प्रकरणांची क्षेत्रीय तपासणी पूर्ण करण्यात येऊन प्रलंबित अनुदान लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
*तुषार सिंचनाचे अनुदान ३३ शेतकर्यांनाच
८५५ शेतकर्यांनी तालुक्यात तुषार सिंचन संच बसविले असून, यापैकी फक्त ३३ शेतकर्यांनाच अनुदान देण्यात आले आहे. फक्त १६0 शेतकर्यांच्याच प्रस्तावांची क्षेत्रीय तपासणी पूर्ण झाली असून, अद्यापही तब्बल ६२२ शेतकर्यांच्या प्रस्तावांची क्षेत्रीय तपासणी होणे बाकी आहे. ही तपासणी केव्हा होणार व अनुदान केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा खर्च करून बसलेल्या शेतकर्यांना लागली आहे.