बीएचआरच्या १३ संचालकांना अटक

By Admin | Published: May 28, 2016 01:56 AM2016-05-28T01:56:48+5:302016-05-28T01:56:48+5:30

आकोट येथील पतसंस्थेतील घोटाळा; ८0 लाखांनी केली होती फसवणूक

13 directors of BHR arrested | बीएचआरच्या १३ संचालकांना अटक

बीएचआरच्या १३ संचालकांना अटक

googlenewsNext

आकोट: भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्था (बीएचआर) च्या आकोट शाखेतील ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी १३ संचालकांना अटक केली.
आकोट येथील बीएचआर पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवी जमा केल्या होत्या. रकमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे ठेवीदारांचे म्हणणे होते. ठेवीची मुदत संपल्यावरही मुळ रक्कम, व्याज देण्यास टाळाटाळ करण्यात आली. ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी पतसंस्थेचे उंबरठे झिजवले. अखेर जुलै २0१५ मध्ये आकोट शहर पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या १९ संचालकांसह शाखा अधिकार्‍याविरुद्ध भादंविच्या कलम ४२0, ४0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आकोटातील ठेवीदारांची फसवणूक
आकोट शहरासह परिसरातील ग्राहकांचे तब्बल ८0 लाख रुपये पतसंस्थेमध्ये अडकून पडले आहेत, अशी माहिती सीआयडीचे उपअधीक्षक गजानन शेळके यांनी दिली.

आरोपींना जळगाव येथून घेतले ताब्यात
घोटाळाप्रकरणी सीआयडीने १३ संचालकांच्या अटकेचा आदेश प्राप्त केला. त्यानंतर आरोपींना जळगाव येथील जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये प्रमोद रायसोनी, दिलीप चोरडिया, मोतीलाल जिरी, सूरजमल जैन, दादा पाटील, भगवान माळी, राजाराम कोळी, भागवान वाघ, डॉ. हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवानी, सुखलाल माळी, यशवंत जिरी यांचा समावेश आहे.

सोमवापर्यंत पोलीस कोठडी
सीआयडीने आरोपींना गुरुवारी मध्यरात्री अकोल्यात आणले. त्यानंतर त्यांना शुक्रवारी आकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपींना ३0 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अँड. रेलकर यांनी काम पाहिले.

५४ ठिकाणी गुन्ह्यांची नोंद
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय जळगाव येथे असून, राज्यभरात अनेक ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमध्ये मोठय़ा संख्येने ग्राहकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मुदत संपल्यानंतरही ग्राहकांना पैसे परत मिळत नसल्याने व बँकेचे व्यवहार डबघाईस आल्याने राज्यभरात ५४ ठिकाणी फसवणुकीसंदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: 13 directors of BHR arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.