13 किलोची सोन्याची साडी महालक्ष्मीला परिधान

By Admin | Published: October 11, 2016 02:57 PM2016-10-11T14:57:43+5:302016-10-11T14:59:21+5:30

विजयादशमी निमित्त सारसबाग येथील महालक्ष्मी देवीला रात्री बारा वाजता13 किलो वजनाची सोन्याची साडी (महावस्त्र) परिधान करण्यात आली.

13 kg gold sari Mahalaxmi dressing | 13 किलोची सोन्याची साडी महालक्ष्मीला परिधान

13 किलोची सोन्याची साडी महालक्ष्मीला परिधान

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ -  विजयादशमी निमित्त सारसबाग येथील महालक्ष्मी देवीला रात्री बारा वाजता13 किलो वजनाची सोन्याची साडी (महावस्त्र) परिधान करण्यात आली. ती साडी पाहण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात तुडूंब गर्दी केली होती.
गेल्या वर्षीपासून महालक्ष्मी देवीला ही 13 किलो वजनाची साडी केवळ दसरा व लक्ष्मी पूजनला परिधान करण्यात येते. या साडीची निर्मिती चेन्नई येथील कारागिरांनी केली असून वर्षातून फक्त दोनदाच ही साडी परिधान केली जात असल्याची माहिती श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक ऋषिकेश मोरे यांनी दिली. सोमवारी रात्री बारा वाजल्यानंतर देवीला ही साडी परिधान करण्यात आली. त्यानंतर देवीची पूजा करण्यात आली.

Web Title: 13 kg gold sari Mahalaxmi dressing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.