१३ सख्ख्या भावंडांमध्ये साठीनंतरही एकमेकांचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 04:17 AM2017-05-08T04:17:41+5:302017-05-08T04:17:41+5:30

लग्न झाल्यानंतर तरुण पिढी आई-वडील आणि भाऊ-बहिणींना विसरून जाते, असे बोलले जाते, परंतु वयाचीसाठी ओलांडल्यानंतरही

For 13 siblings, take one another for later | १३ सख्ख्या भावंडांमध्ये साठीनंतरही एकमेकांचा लळा

१३ सख्ख्या भावंडांमध्ये साठीनंतरही एकमेकांचा लळा

Next

रणजित शिंदे / लोकमत न्यूज नेटवर्क

कुसुंबा (धुळे) : लग्न झाल्यानंतर तरुण पिढी आई-वडील आणि भाऊ-बहिणींना विसरून जाते, असे बोलले जाते, परंतु वयाची
साठी ओलांडल्यानंतरही सख्ख्या १३ भाऊ-बहिणींचा एकमेकांशी लळा कायम असल्याचे सुखावह दृश्य येथे दिसले. साठी
ओलांडलेल्या १३ भावंडांनी केसरताई बारीकराव शिंदे या बहिणीची पंचाहत्तरी धूमधडाक्यात साजरी केली.  कुटुंबातील सर्वात थोरली ८४ वर्षांची बहीणही त्यात सहभागी झाली होती. माहेरवाशीण द्वारकाबाई भामरे (८४), जावतराबाई भदाणे (७३), जिजाबाई नेरपगार (७१), वत्सलाबाई देसले (६९), विमलबाई पंडित (६७), कमलबाई शिरसाठ (६१), सुमनबाई निकम (५८), सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंढरीनाथ ठाकरे (८२), रघुनाथ ठाकरे (८०), एकनाथ ठाकरे (७२), सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी धनराज ठाकरे (६५), उपप्राचार्य सुरेश दगडू ठाकरे ही भावंडे सोहळ््यात हरखून गेली होती. त्यांच्यासह मुली, जावई, नातू, सुना, नातेवाईकही उपस्थित होते.


निर्व्यसन आरोग्याची गुरुकिल्ली


केसरतार्इंचे वडील दगडू झुगरू ठाकरे हे वावडे (अमळनेर) गावाचे १५ वर्षे सरपंच होते. त्यांच्या पत्नी कासुबाई यांनी मुलांना चांगले संस्कार केले. दोघेही सध्या हयात नाहीत. हे कुटुंब पूर्णत: निर्व्यसनी आहे. सर्व नातू, नात हे उच्चशिक्षित आहेत.

आम्ही पूर्वीपासूनच एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. सर्वांचे आरोग्य ठणठणीत आहे. लहानपणापासून एकमेकांचा असलेला लळा कायम आहे.
- केसरताई शिंदे, कुसुंबा

Web Title: For 13 siblings, take one another for later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.