मोखाडा तालुक्याचे १३ टँकर प्रस्ताव पडून

By admin | Published: February 28, 2017 02:53 AM2017-02-28T02:53:49+5:302017-02-28T02:53:49+5:30

धामोडी पेंडक्याची ठवळपाडा टेलीउंबरपाडा असे टँकर पाणीपुरवठ्याचे १३ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून आहेत.

13 tanker proposal of Mokhada taluka | मोखाडा तालुक्याचे १३ टँकर प्रस्ताव पडून

मोखाडा तालुक्याचे १३ टँकर प्रस्ताव पडून

Next


मोखाडा : या तालुक्यातील धामणी कुंडाचापाडा तुंगारवाडी स्वामीनगर दापटी ब्राम्हणगाव हटीपाडा घोसाळी गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळपाडा टेलीउंबरपाडा असे टँकर पाणीपुरवठ्याचे १३ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे यामुळे मार्च एप्रिलमध्ये उद्भवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भीषण पाणी टंचाईची दाहकता सोसणाऱ्या येथील गावपाड्यांना अद्याप तरी त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही यामुळे जिल्हाधिकारी याची गांभीर्याने कधी दखल घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरवर्षीच येथील भूमीपुत्राना वर पाणीटंचाईचे संकट निर्माण होत असल्याने घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते टँकरच्या नावाखाली करोडोचा खर्च करणारे प्रशासन या ठिकाणी असलेल्या मुबलक पाणीसाठ्याचे नियोजन धड करीत नाही. (वार्ताहर)
सुरवातीला टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला असतात त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा या मागणीचे १३ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.-आकाश किसवे, तहसीलदार, मोखाडा

Web Title: 13 tanker proposal of Mokhada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.