केंद्राकडून GST पोटी १३ हजार २१५ कोटी थकीत, महाराष्ट्राला दोन वर्षांचा परतावा मिळाला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:05 PM2023-01-19T12:05:43+5:302023-01-19T12:06:10+5:30

कोरोनानंतर सावरत असलेल्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी ही जीएसटीची रक्कम संजीवनी ठरू शकते

13 thousand 215 crore due from the Center under GST Maharashtra did not get refund for two years! | केंद्राकडून GST पोटी १३ हजार २१५ कोटी थकीत, महाराष्ट्राला दोन वर्षांचा परतावा मिळाला नाही!

केंद्राकडून GST पोटी १३ हजार २१५ कोटी थकीत, महाराष्ट्राला दोन वर्षांचा परतावा मिळाला नाही!

googlenewsNext

मनोज मोघे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सरकार बदलले तरीही केंद्र सरकारकडून येणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) परतावा अद्यापही थकीत आहे. जीएसटी परताव्याचे तब्बल १३ हजार २१५ कोटी अजूनही राज्याला केंद्राकडून येणे आहेत. कोरोनानंतर सावरत असलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी ही जीएसटीची रक्कम संजीवनीच ठरणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्राकडून जीएसटीपोटी येणाऱ्या थकबाकीची रक्कम जाहीर सभांतून सांगितली जात होती. जूनमध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यावेळी सुमारे २२ हजार कोटींची जीएसटी थकबाकी येणे होती. यापैकी २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे जीएसटीचे ८ हजार कोटी केंद्र सरकार आणि कॅगकडे पाठपुरावा करून मिळविण्यात आले. मात्र, अद्यापही सुमारे १३ हजार २१५ कोटींचे येणे बाकी आहे.

Web Title: 13 thousand 215 crore due from the Center under GST Maharashtra did not get refund for two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी