१३ वर्षांच्या मुलीस कोंडून डॉक्टरने केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:07 AM2018-04-23T01:07:54+5:302018-04-23T01:07:54+5:30
ही मुलगी काही औषधे आणण्यासाठी वर्मा याच्या दवाखान्यात गेली होती. त्याने गुंगी आणणारे औषध देऊन तिला कोंडले व बलात्कार केला
१३ वर्षांच्या मुलीस कोंडून डॉक्टरने केला बलात्कार
मुजफ्फरनगर : १३ वर्षांच्या एका मुलीला तीन दिवस दवाखान्यात कोंडून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सोनु वर्मा या डॉक्टरला अटक केली.
मंडल पोलीस अधिकारी एस. के. एस. प्रताप यांनी सांगितले की, तीन दिवसांनंतर ही मुलगी दवाखान्यातून पळाली. झाला प्रकार सांगितल्यावर तिच्या वडिलांनी फिर्याद नोंदविली. वडील व गावकरी तीन दिवस मुलीचा शोध घेत होते. ही मुलगी काही औषधे आणण्यासाठी वर्मा याच्या दवाखान्यात गेली होती. त्याने गुंगी आणणारे औषध देऊन तिला कोंडले व बलात्कार केला, असा आरोप आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले व डॉक्टरच्या दवाखान्याला सील ठोकण्यात आले. (वृत्तसंस्था)
दोन विद्यार्थिनींवर शिक्षकाचा बलात्कार
उत्तर दिनाजपूर (प. बंगाल) : जिल्ह्यातील एका सरकारी अनुदानित प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर शिक्षकाने शाळा संपल्यानंतर सलग चार दिवस बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.
३५ वर्षांचा हा विवाहित शिक्षक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोनपैकी एका पीडित मुलीने शनिवारी शाळेत जाण्यास नकार दिला. पालकांनी कारण खोदून खोदून विचारल्यावर मुलीने झाला प्रकार सांगितला व दुसऱ्या पीडित मुलीचे नावही सांगितले. दुसºया मुलीनेही पहिलीच्या सांगण्याला दुजोरा दिला. त्यानंतर, दोन्ही मुलींच्या वडिलांनी राजगंज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. नंतर राजगंज सरकारी इस्पितळात केलेल्या तपासणीत दोघींवरही बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)
१७ वर्षांच्या पित्याने केला २ महिन्यांच्या मुलाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मंगोलपुरी भागात स्वत:च्या दोन महिन्यांच्या मुलाचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी १७ वर्षांच्या पित्याला अटक केली. त्याची पत्नी १६ वर्षांची असून तिला हा मुलगा अनैतिक संबंधांतून झाल्याच्या संशयातून त्याने हा खून केला.
निपचित झालेल्या या मुलाला त्याची आई इस्पितळात घेऊन आली, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा गळा आवळल्याच्या खुणा दिसल्या. पोलिसांनी आईकडे चौकशी केली असता तिने तिच्या पतीवर संशय व्यक्त केला. काही तासांतच या मुलाच्या १७ वर्षाच्या पित्याला अटक झाली. त्याने मुलाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या अल्पवयीन दाम्पत्याने वर्षभरापूर्वी मंदिरात विवाह केला होता. यातील पत्नी सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात नोकरी करते. तिचा पती मात्र अमली पदार्थांचा व्यसनी असून काही कामधंदा करत नाही. सुरुवातीस मुलीच्या घरच्यांनी विवाहास विरोध केला पण ती गरोदर राहिल्यावर ते लग्न करून देण्यास राजी झाले होते. शनिवारी सायंकाळी पत्नी कामावर गेलेली असताना हा १७ वर्षांचा पती नशेत घरी आला. खरे तर तान्ह्या मुलाला त्याच्या भरवशावर घरात ठेवून पत्नी कामावर गेली होती. मुलगा रडू लागल्यावर या पोरसवदा बापाने आधी त्याला चपलेने मारले व नंतर गळा आवळून त्याचे रडमे बंद करम्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.