प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी १३ वर्षिय बालकाची वाशिम ते सेवाग्राम सायकलवारी

By admin | Published: October 3, 2016 07:53 PM2016-10-03T19:53:06+5:302016-10-03T19:53:06+5:30

वाशिम ते सेवाग्राम सायकलवारी करुन वाढत्या प्रदूषणाला रोख देण्यासाठी सायकलचा वापर करण्याबाबत जनजागृती

13-year-old girl from Washim to Sewagram riding cycle for public awareness on pollution | प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी १३ वर्षिय बालकाची वाशिम ते सेवाग्राम सायकलवारी

प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी १३ वर्षिय बालकाची वाशिम ते सेवाग्राम सायकलवारी

Next
>नंदकिशोर नारे / आॅनलाइन लोकमत
 
वाशिम, दि. 3-  जिल्हयात प्रसिध्द असलेल्या ‘वाशिम सायकलस्वार’ गृपने वाशिम ते कन्याकुमारी,  वाशिम ते लालबागचा राजा(मुंबई) व आता वाशिम ते सेवाग्राम सायकलवारी करुन वाढत्या प्रदूषणाला रोख देण्यासाठी सायकलचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. यामध्ये ४ युवकासह एका १३ वर्षिय बालकाचा सहभाग होता हे उल्लेखनिय. 
 
वाशिम सायकलस्वार गृपमधील १३ वर्षिय हरक पटेलसह श्रीनिवास व्यास, आदेश कथडे, सागर रावले, दिपक एकाडे यांनी दोन दिवसात वाशिम ते सेवाग्राम ही ४३० किलोमिटरचे अंतर दोन दिवसात पार केले. वाहनातील धुरामुळे पर्यावरणावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे.  यामुळे माणसांच्या आजारांमध्ये वाढ, प्राणीमात्रांच्या जिवनावर धोका निर्माण झाला आहे.
 
त्यामुळे सायकलमुळे प्रदूषणाला आळा मिळू शकतो याकरिता वाशिममध्ये सायकल गृपची स्थापना करण्यात आली आहे . यामध्ये तहसीलदार, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, विधिज्ञ मंडळासह नामांकीत नागरिकांचा समावेश तर आहेच शिवाय ४ महिलांसह ६० सदस्यांचा गृप आहे.
 
 

Web Title: 13-year-old girl from Washim to Sewagram riding cycle for public awareness on pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.