संजय गांधी योजनेचे पेन्शन १३० जणांना मंजूर

By Admin | Published: July 13, 2017 03:34 AM2017-07-13T03:34:50+5:302017-07-13T03:34:50+5:30

संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १९८ पैकी १३८ प्रकरणांना तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे़

130 pension sanctioned for Sanjay Gandhi scheme | संजय गांधी योजनेचे पेन्शन १३० जणांना मंजूर

संजय गांधी योजनेचे पेन्शन १३० जणांना मंजूर

googlenewsNext

राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १९८ पैकी १३८ प्रकरणांना तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे़ उर्वरीत प्रकरणांना पुढील महिन्यांत मंजूरी मिळणार आहे. त्यामुळे दुर्बल घटकात समाधानाचे वातावरण आहे.
विक्रमगड तालुक्यात संजय गांधी विभाग (शाखा) मंजूर नसल्याने व समिती गठीत होत नसल्याने दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना त्यापासून मिळणा-या माधनापासून वंचीत राहावे लागत होते, परंतु नुकतीच ही समिती स्थापन करण्यांत आली असून ती तत्परतेने अर्जांबाबत निर्णय घेत आहे. कमिटीचे अध्यक्ष संदिप पावडे तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी या योजनेचा जास्तीत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
या योजनेद्वारे कुष्ठ,अपंग, विधवा, वृध्द, गतिमंद यांना दर तीन महिन्यांनी पेन्शन देण्यात येते़ या योजनेच्या लाभार्थ्यांनी केलेल्या अर्जांना तत्परतेने मंजूरी दिली जाते आहे, असे त्यांना मंजूर झालेले पेन्शन वेळेवर मिळेल याकडेही लक्ष पुरविले जाते आहे. आता समिती स्थापन झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीला चांगलीच गती प्राप्त झाली आहे. यावेळी झालेल्या बैठकीत संजय गांधी अव्वल कारकुन परशुराम चंद्रे, समितीचे सदस्य सुप्रतिक आळशी, हसमुख पटेल यांचीही उपस्थिती होती़ या योजने अंतर्गत लाभार्थींना दर तीन महिन्यांनी पेन्शन दिले जाते. सध्या योजनेची अंमलबजावणी तत्परतेने होत असल्यामुळे इच्छुकांकडून येणाऱ्या अर्जाच्या संख्येतही मोठी वाढ घडून आली आहे. त्यासोबतच अनेक गवशेही त्यात घुसू पाहत आहेत. त्यांचाही बंदोबस्त समितीकडून होतो आहे.
या योजनेचा लाभार्थ्यांनी दुरूपयोग करु नये़ ज्यावेळेस आमचे समोर प्रकरण येते त्यामध्ये अनेक लोक खोटी नाटी कागदपत्रे सादर करीत आहेत़ अनेक कागदपत्रांत खाडाखोड करुन लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु आम्ही बारकाईने याची तपासणी करीत असल्याने अशी प्रकरणे निकाली काढली जातात़ तर वैद्यकीय अधिका-यांनी वयाचा दाखला देतांना वय आकडया व अक्षरात लिहावे़ अशी सुचना केली आहे. खोटी कागदपत्रे सादर करणा-यांवर योग्य ती कारवाई होईल. - संदिप पावडे, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना
अध्यक्ष संदिप पावडे, तहसिलदार सुरेश सोनवणे, सदस्य सुप्रतिक आळशी, हसमुख पटेल

Web Title: 130 pension sanctioned for Sanjay Gandhi scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.