१३० मतदान केंद्र संवेदनशील

By admin | Published: February 16, 2017 01:31 PM2017-02-16T13:31:25+5:302017-02-16T13:31:25+5:30

२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी ७३८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

130 polling stations are sensitive | १३० मतदान केंद्र संवेदनशील

१३० मतदान केंद्र संवेदनशील

Next

१३० मतदान केंद्र संवेदनशील
सजगता : ८६ जागांसाठी मतदान

अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी ७३८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. २२ प्रभागांतील ८६ जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी झोनहिाय मतदान केंद्र राहतील.
महापालिका क्षेत्रात ५ लाख ७२ हजार ६४८ एकूण मतदार आहेत. यात २ लाख ९५ हजार ३१५ परुष मतदार, २७७३०५ स्त्री मतदार तर २८ अन्य मतदार आहेत. मतदारनिहाय संख्येच्या आधारावर मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेत.
शेगाव-रहाटगाव प्रभागातील ४, श्री संत गाडगेबाबा, पीडीएमसी प्रभागातील २, नवसारी प्रभागातील ७, महेंद्र कॉलनी - नवीन मार्केट प्रभागातील २०, विलासनगर - मोरबागमधील १४, जवाहरगेट - बुधवारातील १५, छायानगर - गवळीपुरा प्रभागातील १४, अलिमनर - रहमतनगरमधील १३, राजापेठ - संत कंवरराम प्रभागातील ३, साईनगर व सुतगिरणी प्रभागातील प्रत्येकी ४, जुनीवस्ती बडनेरातील १२ आणि नवीवस्ती बडनेरा १८ मतदार केंद्र अशी एकूण १३० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने पूर्वतयारी चालविली आहे.
महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ३४,४२१ मतदार सूतगिरणी प्रभागात असून त्यापाठोपाठ ३२,९४३ मतदार बेनोडा-भीमटेकडी-दस्तुरनगर प्रभागात आहेत. एकमेव ३ सदस्यीय एसआरपीएफ प्रभागात एकूण १८,३१६ मतदार आहेत. चार सदस्यीय २१ प्रभागांत जमील कॉलनीत २१,२९२ मतदारसंख्या आहे. (प्रतिनिधी)

अशी आहेत मतदान केंद्र
४शेगाव रहाटगाव ३०, पीडीएमसी ३२, नवसारी ३४, जमील कॉलनी २८, महेंद्र कॉलनी ३१, विलासनगर - मोरबाग २४, बेनोडा - भीमटेकडी ४२, फ्रेजरपुरा - ३५, रुख्मिणीनगर - स्वामी विवेकानंद ३३, अंबापेठ - गौरक्षण ३४, जवाहरगेट - बुधवारा ३७, छायानगर - गवळीपुरा ३०, अलिमनगर - रहमतनगर ३०, गडगडेश्वर ३८, राजापेठ - श्रीसंत कंवरराम ४०, साईनगर ३८, सूतगिरणी ४४, जुनीवस्ती बडनेरा ३२, नवीवस्ती बडनेरा ३२, अशी केंद्र आहेत.

Web Title: 130 polling stations are sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.