भाडेतत्त्वावरील १३१० बस लवकरच एसटीच्या ताफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 08:02 AM2024-09-07T08:02:05+5:302024-09-07T08:02:56+5:30

ST Bus: राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन बस खरेदीबरोबरच भाडेतत्वावर गाड्या घेण्यावर भर देत आहे. या धोरणानुसार लवकरच ५००० हून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार असून, त्यापैकी १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

1310 buses on lease soon in fleet of ST | भाडेतत्त्वावरील १३१० बस लवकरच एसटीच्या ताफ्यात

भाडेतत्त्वावरील १३१० बस लवकरच एसटीच्या ताफ्यात

 मुंबई - राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन बस खरेदीबरोबरच भाडेतत्वावर गाड्या घेण्यावर भर देत आहे. या धोरणानुसार लवकरच ५००० हून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार असून, त्यापैकी १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांत लालपरी आता नव्या रूपात अवतरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४,००० बस आहेत. त्यापैकी ३५० गाड्या भाडेतत्त्वावरील असून, त्यातील शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते लक्षात घेऊन भाडेतत्त्वावर आणखी काही बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या बसचे चालक, डिझेलपुरवठा आणि बसची तांत्रिक देखभाल खासगी संस्थांमार्फत करण्यात येणार असून, त्याबदल्यात त्यांना प्रतिकिलोमीटर प्रमाणे भाडे देण्यात येईल. हा करार ७ वर्षांसाठी असेल.

विभाग व भाडेतत्त्वावरील बस
-  मुंबई आणि पुणे - ४५० 
- छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक - ४३० 
- अमरावती व नागपूर - ४६०

Web Title: 1310 buses on lease soon in fleet of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.