रस्ते अपघातांत १ वर्षात १३,३४६ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:54 AM2022-01-20T07:54:58+5:302022-01-20T07:55:15+5:30
२०१९च्या तुलनेत अपघातांत ११ टक्के घट, तर मृत्यूंमध्ये ४ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातांच्याही घटना वाढल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत २९,२९१ अपघात झाले असून, या अपघातांत १३,३४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. २०१९च्या तुलनेत अपघातांत ११ टक्के घट, तर मृत्यूंमध्ये ४ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालविणे, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालविणे ही कारणे आहेत. राज्यात गेल्या वर्षी २९,२९१ अपघात झाले. यांत १३, ३४६ जणांचा मृत्यू झाला, तर १५,९२२ जण गंभीर जखमी झाले. २०२० मध्ये लॉकडाऊन असल्याने अपघातांची संख्या कमी होती. त्यामुळे २०२१ च्या अपघातांची तुलना २०१९च्या अपघातांशी करण्यात आली आहे.