जकात चुकविलेले १३७ कोटींचे दागिने जप्त

By admin | Published: March 12, 2016 04:00 AM2016-03-12T04:00:13+5:302016-03-12T04:00:13+5:30

गेल्या आठवड्यात दीड कोटी रुपये जकात चुकवून आलेला माल जप्त केल्यानंतर पालिकेच्या दक्षता पथकाने पुन्हा मोठी कारवाई केली आहे़ जकात चुकवून मुंबईत आलेले १३७ कोटी किमतीचे सोने

137 crores of jewelery seized jewelery seized | जकात चुकविलेले १३७ कोटींचे दागिने जप्त

जकात चुकविलेले १३७ कोटींचे दागिने जप्त

Next

मुंबई : गेल्या आठवड्यात दीड कोटी रुपये जकात चुकवून आलेला माल जप्त केल्यानंतर पालिकेच्या दक्षता पथकाने पुन्हा मोठी कारवाई केली आहे़ जकात चुकवून मुंबईत आलेले १३७ कोटी किमतीचे सोने, चांदी, हिरे जप्त करण्यात आले. तसेच पालिकेने जकात व दहापट दंड असे सुमारे ५७ लाख रुपयेही संबंधितांकडून वसूल केले आहेत़
पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या जकात उत्पन्नामध्ये या आर्थिक वर्षात घट झाली
आहे़ त्यामुळे पालिकेने जकात
चुकवून येणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली
आहे़ त्यानुसार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून जकात न भरता वाहन क्ऱ एमएच ०४ एफ पी ८७६ आणि एमएच ०४ जीआर ७०१३ या क्रमांकाच्या गाड्यांमधून माल आल्याची खबर दक्षता पथकाला मिळाली होती़
या दोन गाड्या पालिकेच्या दक्षता पथकाने जप्त केल्या़ गाड्यांमध्ये सोने, चांदी, जवाहिरे असा एकूण १३७ कोटींचा माल होता़ नियमानुसार हिरे, सोने या मौल्यवान धातूंवर अत्यंत नाममात्र म्हणजे ०़०१ टक्के एवढी जकात आकारली जाते़ त्यानुसार केवळ पाच लाख रुपये जकातीपोटी संबंधितांना भरावे लागले असते़ मात्र यातही बनावगिरी केल्यामुळे संबंधित मालकाला तब्बल ५७ लाख रुपये जकात व दंड भरावा लागला़ (प्रतिनिधी)

Web Title: 137 crores of jewelery seized jewelery seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.