वर्धा जिल्ह्यात १४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा
By admin | Published: June 11, 2015 01:19 AM2015-06-11T01:19:59+5:302015-06-11T01:19:59+5:30
महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनद्वारा (तंत्रशिक्षण संचालनालय) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर ९६ संस्थांनी डल्ला मारला
वर्धा : महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनद्वारा (तंत्रशिक्षण संचालनालय) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर ९६ संस्थांनी डल्ला मारला असून त्यातील ४६ शिक्षण संस्थांनी १४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट आम आदमी पार्टीने (आप) माहिती अधिकारातून मिळालेल्या दस्तावेजाच्या आधारे केला आहे. ‘आप’चे रविशंकर बाराहाते व पंकज सत्यकार यांनी पत्रकार परिषदेत शिष्यवृत्ती घोटाळ््याची माहिती दिली.
२००१ ते २०१० कालावधीमधील विदर्भातील शिष्यवृत्ती घोटाळ््याचे उगमस्थानच वर्धा जिल्हा असल्याचे बोलले जात होते. जिल्ह्यातील ४६ संस्थांनी १३ कोटी ८१ लाख १८ हजार १८ रुपयांचा घोटाळा केल्याचे माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या दस्तावेजावरून दिसून येते.
घोटाळ््यात भाजपाच्या एका आमदाराच्या संस्थेचा समावेश असल्याने सरकार कारवाई टाळत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिळालेल्या दस्तावेजानुसार ९६ शिक्षण संस्थांनी शिष्यवृत्तीच्या रकमेचा अपहार केला. त्यातील बहुतांश महाविद्यालये बंद झाल्याचेही दिसून येत असल्याचे बाराहाते व सत्यकार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)