सतीश शेट्टी हत्या प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By admin | Published: April 16, 2016 05:12 PM2016-04-16T17:12:16+5:302016-04-16T17:12:16+5:30

अटक करण्यात आलेले आरोपी भाऊसाहेब आंधळकर आणि नामदेव कोठाळेला आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली आहे

14-day judicial custody for suspects in Satish Shetty murder case | सतीश शेट्टी हत्या प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सतीश शेट्टी हत्या प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. १६ - माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी भाऊसाहेब आंधळकर आणि नामदेव कोठाळेला आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
 
दरम्यान भाऊसाहेब आंधळकर यांनी पुण्यातील कारागृहात न ठेवण्यासाठी न्यायालयाकडे विनंती अर्ज केला आहे. आपल्या कारकिर्दीत अटक केलेल्या आरोपींकडून धोका असल्याचा दावा भाऊसाहेब आंधळकर यांनी विनंती अर्जात केला आहे. शेट्टी यांची जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे हत्या झाली़ होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
 
सतीश शेट्टी हत्या प्रकरणी सर्वात अगोदर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 11 एप्रिलला पुणे ग्रामीण पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव कोठाळेला अटक करण्यात आली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही अटकेची कारवाई केली होती. महत्वाचं म्हणजे नामदेव कोठाळे हा  भाऊसाहेब आंधळकर यांच्यासोबत कार्यरत होता.
 

Web Title: 14-day judicial custody for suspects in Satish Shetty murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.