सात वीजचोरांना १४ दिवसांची कोठडी
By admin | Published: January 19, 2016 03:45 AM2016-01-19T03:45:11+5:302016-01-19T03:45:11+5:30
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील निंबळकमधील सात वीज ग्राहकांना महावितरणच्या भरारी पथकाने दुसऱ्यांदा वीजचोरी करताना पकडले.
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील निंबळकमधील सात वीज ग्राहकांना महावितरणच्या
भरारी पथकाने दुसऱ्यांदा वीजचोरी करताना पकडले. या सातही वीजचोरांना बार्शीतल्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने न्यायालयीन
कोठडी सुनावली आहे. वीजचोरी प्रकरणी एकाचवेळी सात जणांना
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शंकर दामू भोसले, मोहन राजाराम वाघमारे, चंद्रकांत माणिक पवार, विजय गोरख वाघमारे, बापुराव नागनाथ पाटील, जनार्दन श्यामराव पाटील आणि अण्णासाहेब मच्छिंद्र पवार यांनी वीजचोरी केल्याचे महावितरणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. सातही जणांना यापूर्वीही वीजचोरीच्या गुन्ह्यांत दोषी ठरवण्यात आले होते. तरीही त्यांनी वीजचोरी करणे थांबवले नाही.
गौडगावमधील शाखा अभियंता प्रशांत जानपुरे यांच्या तक्रारीवरून
या महावितरणच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (प्रतिनिधी)