मॉलमध्ये चेंगराचेंगरीत 14 जखमी
By admin | Published: July 8, 2014 01:25 AM2014-07-08T01:25:25+5:302014-07-08T01:25:25+5:30
अभिनेता रितेश देशमुखला प्रोझोन मॉलमध्ये पाहण्यासाठी आलेल्या तरुणांच्या गर्दीत सरकत्या जिन्याचा पट्टा तुटून झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जण जखमी झाले.
Next
औरंगाबाद : अभिनेता रितेश देशमुखला प्रोझोन मॉलमध्ये पाहण्यासाठी आलेल्या तरुणांच्या गर्दीत सरकत्या जिन्याचा पट्टा तुटून झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जण जखमी झाले.
‘लय भारी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या रितेशला पाहण्यासाठी तरुणाईने मॉलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत रितेश येण्यापूर्वीच तरुणांनी ‘रितेश आला रे, आला’ असा आरडाओरड सुरू केला. यावेळी तरुणांनी जिना गच्च भरला होता. जिन्यावर उभे असलेले तरुण रितेशला पाहण्यासाठी माना वर करत होते. त्यातच जिन्याचा साईड बेल्ट तुटला व जिना बंद पडून चेंगराचेंगरी झाली. तय्यब पठाण हा डोक्याला मार लागल्याने जखमी झाला. त्याच्यासोबतच त्याचा मित्रही खाली पडला. हे दोघे पडताच त्यांच्या अंगावर 3क् ते 35 तरुण पडले. सत्यम सिनेमागृहात रितेशची पत्रकार परिषद सुरू असताना गर्दी वाढतच गेली. सुरक्षारक्षकांनी गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करताच तरुणांच्या गर्दीतून आवाज वाढतच गेला. त्याचवेळी ही घटना घडली.
पट्टा तुटल्यामुळे जिन्याच्या शेजारची काच फुटली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तरुणांचा आरडाओरडा पुन्हा सुरूच होता. जिन्यात उभ्या असलेल्या तरुणांपैकी काहींचे कपडे फाटले, तर काहींच्या हातापायाला किरकोळ मार लागला. काहींच्या किमती वस्तू हरवल्या. या घटनेचा साक्षीदार असलेल्या अलीम पटेल म्हणाला की, मी खाली पडल्यामुळे माङया हातापायाला मार लागला. रितेश प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा सुरक्षारक्षकांच्या मदतीने चार हात दुरूनच त्याचे तरुणांना दर्शन झाले.(प्रतिनिधी)
अपुरा पोलीस बंदोबस्त
प्रोझोन मॉल व्यवस्थापनाने कार्यक्रमासाठी योग्य पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली होती. त्यांच्या अर्जानुसार आम्ही दोन फौजदार आणि दहा पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला होता, असे सिडको एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक अशोक सोनवणो यांनी सांगितले. गर्दी किती होणार, याची मॉल प्रशासनाने आम्हाला कल्पनाच दिलेली नव्हती. तसेच मॉलची क्षमता किती आणि किती लोकांना आतमध्ये सोडावे, याचेही प्रशासनाने नियोजन केले नव्हते, असे सोनवणो म्हणाले.
तांत्रिक क्षमता एकपट;
गर्दी दहापट
या मॉलमधील ऑटोमॅटिक लिफ्टची कॅरिंग कॅपॅसिटी (निर्वहन क्षमता) साधारणत: 1 टनर्पयत आहे. मात्र, त्यावर 1क् टनांर्पयतचा मानवी भार पडल्यामुळे लिफ्टच्या बाजूचे स्टीलगार्ड तुटले. त्या गार्डला लावलेल्या काचा तुटून उपस्थित गर्दीवर पडल्यामुळे अनेकांना जखमी व्हावे लागले. मुळात मॉलमधील फायर व लिफ्टच्या सुरक्षेची एनओसी एमआयडीसीने दिलेली आहे.
काळजी घेणो गरजेचे
त्या लिफ्टच्या चेनची व इतर तांत्रिक पार्ट्सची दर आठवडय़ाला किं वा किमान महिन्याला तरी पाहणी करावी लागते. पाहणी अंती काही त्रुटी आढळल्यास त्यांची दुरुस्ती करावी लागते. मॉलमध्ये जास्त गर्दी होणार असल्याचे समजताच ती लिफ्ट बंद ठेवून त्यावर नागरिकांना प्रवेश देऊ नये, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागील सूत्रंनी सांगितले.