‘कॅशलेस’मुळे १४ लाख बँक कर्मचारी अडचणीत
By admin | Published: April 10, 2017 03:53 AM2017-04-10T03:53:21+5:302017-04-10T04:44:47+5:30
नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस रोजगार नष्ट होत चालला असून, कॅशलेस अर्थव्यवस्था आल्यास
संगमनेर (अहमदनगर) : नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस रोजगार नष्ट होत चालला असून, कॅशलेस अर्थव्यवस्था आल्यास साडेतेरा लाख बँक कर्मचारी व पाच लाख ‘एटीएम’ कर्मचारी बेरोजगार होतील, अशी भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते म्हणाले, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही सर्वांत जास्त समाजहिताची असूनदेखील भाजपा सरकार अगदी तुटपुंजी रक्कम उच्च शिक्षणावर खर्च करत आहे. अवघ्या एक हजार कोटी रुपयांच्या तरतुदीत जागतिक दर्जाचे २० विश्वविद्यालये भारतात कसे उभे राहणार? असा सवाल उपस्थित करत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारला हलवले पाहिजे, अन्यथा भारतावर मोठे आर्थिक संकट ओढावेल.
संस्थेचे प्रमुख आ. डॉ. सुधीर तांबे यांनी सह्याद्रीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा मांडला. आजच्या शिक्षणात गुणवत्ता हा चिंतेचा विषय बनला असून, पारंपरिक शिक्षणाला विज्ञान, संस्कार, कौशल्य व रोजगारक्षम शिक्षणाची जोड दिल्यास भावी पिढीतील तरुणाईचा आत्मविश्वास वाढेल, अशी आशा माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संस्थेच्या वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)