शिवसेनेचा पराभव करून जिंकलेले १४ जण मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:21 AM2020-01-07T05:21:32+5:302020-01-07T05:21:46+5:30
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात १४ असे मंत्री आहेत की जे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेलेले आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात १४ असे मंत्री आहेत की जे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. १२ असे मंत्री आहेत की ज्यांनी भाजपचा पराभव केला होता.
शिवसेनेचा पराभव केलेले मंत्री असे : बाळासाहेब थोरात (संगमनेर), के. सी. पाडवी (अक्कलकुवा), छगन भुजबळ (येवला), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), राजेश टोपे (घनसावंगी), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), वर्षा गायकवाड (धारावी), यशोमती ठाकूर (तिवसा), विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), डॉ.राजेंद्र शिंगणे (शिंदखेड राजा), अदिती तटकरे (श्रीवर्धन), राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ), विश्वजित कदम (पलूस-कडेगाव).
एकूण ४३ मंत्र्यांपैकी ३९ हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यापैकी २१ मंत्र्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांचाच पराभव केलेला आहे. चार जणांनी राष्ट्रवादीचा, तिघांनी काँग्रेसचा तर सहा जणांनी अपक्ष उमेदवारांचा पराभव केला होता. भाजपचा पराभव करून जिंकलेले मंत्री असे : अजित पवार (बारामती), अशोक चव्हाण (भोकर), अनिल देशमुख (काटोल), नितीन राऊत (उत्तर नागपूर), सुनील केदार (सावनेर), धनंजय मुंडे (परळी), अमित देशमुख (लातूर), शंकरराव गडाख (नेवासा), अस्लम शेख (मालाड पश्चिम), दत्तात्रय भरणे (इंदापूर), संजय बनसोडे (उदगीर), प्राजक्त तनपुरे (राहुरी).
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव केलेले महाविकास आघाडीतील चार मंत्री असे : आदित्य ठाकरे (वरळी), उदय सामंत (रत्नागिरी), शंभूराज देसाई (पाटण), संदीपान भुमरे (पैठण). काँग्रेसचा पराभव करणाऱ्या तीन मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखडी), दादाजी भुसे (मालेगाव बाह्य), बच्चू कडू (अचलपूर) यांचा समावेश आहे.
जयंत पाटील (इस्लामपूर), हसन मुश्रीफ (कागल), संजय राठोड (दिग्रस), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), अब्दुल सत्तार (सिल्लोड) हे सहा मंत्री अपक्ष उमेदवारांचा पराभव करून विधानसभेत पोहोचले.