पासवर्ड चोरून एटीएममधून १४ जणांची फसवणूक करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 08:16 PM2017-08-02T20:16:23+5:302017-08-02T20:17:48+5:30

गर्दी असलेल्या एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून घाई करीत समोरच्या व्यक्तींना गोंधळात टाकून, तर कधी पासवर्ड हेरून कार्डची अदलाबदल करीत १४ जणांच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक करणाऱ्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अखेर पकडले.

14 people cheated and cheated on the ATM by cheating the password | पासवर्ड चोरून एटीएममधून १४ जणांची फसवणूक करणारा अटकेत

पासवर्ड चोरून एटीएममधून १४ जणांची फसवणूक करणारा अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद, दि. 2 - गर्दी असलेल्या एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून घाई करीत समोरच्या व्यक्तींना गोंधळात टाकून, तर कधी पासवर्ड हेरून कार्डची अदलाबदल करीत १४ जणांच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक करणाऱ्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अखेर पकडले. आरोपीला पकडण्यासाठी सायबर क्राइम एक्सपर्टचे योगदान महत्त्वपूर्ण होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहम्मद सलीम हजीर खान (३३,रा. सुनारी, ता. तौर, जि. मेवात, हरियाणा) असे अटक आरोपीचे नाव आहे. उपायुक्त म्हणाले की, गतवर्षी २८ मे २०१६ रोजी विनायक मेळगावे (रा. रामनगर, सिडको) यांच्या एटीएम कार्डचा वापर करून अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातून ३५ हजार रुपये काढले होते. एटीएममधून रक्कम काढण्यात आली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. मुकुंदवाडी परिसरातील भाजी मंडई आणि एपीआय कॉर्नर येथील एटीएम सेंटरसह अन्य दोन एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून, पासवर्ड चोरून आणि रांगेत उभ्या राहणाऱ्या व्यक्तींच्या खात्यातून रकमा पळविण्याच्या तब्बल १४ घटना वर्षभरात घडल्या. काही वेळा पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून पासवर्ड विचारल्यानंतर आरोपी कार्डची अदलाबदल करून फसवणूक करायचा, तर कधी तो रांगेत उभे असलेल्या व्यक्तींना लवकर पैसे काढा,असे म्हणून घाई करायचा. मागील व्यक्तीला आपल्यामुळे उशीर होतो, असे समजून कार्ड एटीएममध्ये टाकल्यानंतर लवकर पैसे न आल्यास संबंधित व्यक्ती तेथून बाहेर पडली की, मागे उभा आरोपी सलीम एटीएममधील तांत्रिक बाबी हाताळून गैरफायदा घेई. सर्व ठिकाणच्या गुन्ह्यात, तेथील सीसीटीव्हीत हा आरोपी कैद झाला. मात्र तो सापडत नव्हता.
सासूरवाडीत यायचा आणि फसवणूक करायचा
४ ठिकाणच्या घटनास्थळ परिसरात काही जण एकमेकांच्या मोबाइलवर सतत संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले. यातील एक क्रमांक कधी औरंगाबादेत तर कधी हरियाणा राज्यात असायचा. त्याच्याशी संपर्कात असलेली व्यक्ती खोडेगाव येथील असल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सायबर क्राइम एक्स्पर्ट सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक संजय बनसोडे, पोलीस कर्मचारी शेख अस्लम, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विष्णू हगवणे यांनी त्याच्याशी संपर्कात असलेल्या त्याच्या सासूरवाडीच्या लोकांना उचलले. त्यांच्या मदतीने त्यास औरंगाबादेत बोलावून ताब्यात घेतले, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: 14 people cheated and cheated on the ATM by cheating the password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.