परमानंद हेवाळेकर वाळीत प्रकरणी १४ ग्रामस्थांना अटक
By admin | Published: September 13, 2016 07:42 PM2016-09-13T19:42:22+5:302016-09-13T19:42:22+5:30
परमानंद हेवाळेकरला वाळीत टाकल्या प्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात महादेवाचे केरवडे गावातील १४ ग्रामस्थांना मंगळवारी अटक करण्यात आली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. १३ - परमानंद हेवाळेकरला वाळीत टाकल्या प्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात महादेवाचे केरवडे गावातील १४ ग्रामस्थांना मंगळवारी अटक करण्यात आली. हेवाळेकर दांपत्य मंत्रालय समोर उपोषणाला बसले होते. त्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बोलवून त्याची व्यथा ऐकून घेतली तसेच त्यांना वर्षा बंगल्यावर पूजेचा मान दिला होता तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
चौकशीत विनयभंग प्रकरणात हेवाळेकर फरार असल्याचे समोर आले होते. शनिवारी रात्री पोलिसांनी हेवाळेकरला अटक करुन न्यायालयात हजर केले त्यानंतर न्यायालयाने लगेचच जामिनावर मुक्तता केली.
कुडाळ पोलिसांनी एवढी लपवा छपवी करीत फरार आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे कारण काय असा सवाल विचारला जात होता. आता या प्रकरणी १४ ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे.