सायन-पनवेल मार्गावर 14 वष्रे भरुदड

By admin | Published: June 28, 2014 12:57 AM2014-06-28T00:57:05+5:302014-06-28T00:57:05+5:30

मुंबई शहर आणि उपनगरादरम्यान मार्गावर यापूर्वीच टोल आकारणी होत असतानाच आता सायन - पनवेल विशेष राज्य महामार्गावरही पहिल्यांदाच टोलवसुली केली जाणार आहे.

14 years on the Sion-Panvel route, Bharudad | सायन-पनवेल मार्गावर 14 वष्रे भरुदड

सायन-पनवेल मार्गावर 14 वष्रे भरुदड

Next
>सुशांत मोरे - मुंबई
मुंबई शहर आणि उपनगरादरम्यान मार्गावर यापूर्वीच टोल आकारणी होत असतानाच आता सायन - पनवेल विशेष राज्य महामार्गावरही पहिल्यांदाच टोलवसुली केली जाणार आहे. या मार्गावर टोलवसुली प्रस्तावित असून तब्बल 14 वर्षे 5 महिने त्याची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईकरांसह अनेकांना त्याचा भरुदड पडणार आहे.  
सायन-पनवेल या 23.9 किलोमीटर सहा पदरी असणा:या राज्य महामार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले. तब्बल 1 हजार 220 कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे तीन वर्षात दहा पदरीकरण केले आहे. सध्या 80 टक्के काम पूर्ण झाले असून आणखी काही कामे येत्या एका महिन्यात पूर्ण केली जाणार आहेत. यापूर्वी सहा पदरी असणा:या या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना  ट्रॅफिक जामला सामोरे जावे लागत होते.  हे पाहता या मार्गाची सुधारणा करताना त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. आता उरलीसुरली कामे पूर्ण करून विधानसभा निवडणुकीआधी या मार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र दहा पदरी मार्ग वाहन चालकांच्या सेवेत येताच त्यांना या मार्गावर पहिल्यांदाच टोलवसुलीला सामोरे जावे लागेल. 
यापूर्वी सायन-पनवेल मार्गावरून प्रवास करताना टोलवसुली होत नव्हती. मात्र या मार्गाचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात आल्यानेच टोलवसुली केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. टोलवसुलीचे काम हे  सायन-पनवेल टोल वे प्रायव्हेट लिमिटेडकरून आकारले जाईल. टोलवसुलीचा कालावधी 17 वर्षे 5 महिने एवढा आहे. मात्र या वसुलीमध्ये कामाच्या कालावधीची तीन वर्षे समाविष्ट असल्याने ती वगळल्यास टोल हा 14 वर्षे 5 महिने आकारला जाणार आहे. कामोठे या एकाच ठिकाणी ही टोल आकारणी होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रंनी सांगितले. ही टोल आकारणी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांवर नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले. 
कामोठेजवळ या मार्गावरील टोल आकारणी होईल. सरकारच्या दरानुसारच वाहनांवर टोल आकारला जाणार असल्याची माहिती मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे चेंबूर अधीक्षक अभियंता दिलीप साळुंखे  यांनी दिली.
 
खारघर टोलनाक्याला विरोध करण्यासाठी आज शिवसेनेने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतूक जवळपास एक तास ठप्प होती. पोलिसांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणो यांच्यासह इतर पदाधिका:यांना अटक करून नंतर सुटका केली.  सायन - पनवेल महामार्गावर खारघरमध्ये होत असलेल्या टोलनाक्याला विरोध वाढत आहे. आतार्पयत काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. यानंतर आता शिवसेनाही  आक्रमक झाली आहे. 
आज बारणो यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता महामार्ग बंद केला.  कोणत्याही स्थितीमध्ये येथील प्रस्तावित टोल बंद झाला पाहिजे. या परिसरातील नागरिकांवर भरुदड बसू नये. स्थानिक नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे जो काही टोल घ्यायचा तो वाशीतच घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.  पोलिसांनी खासदारांसह सेनेचे रायगडचे जिल्हा प्रमुख बबन पाटील यांच्यासह इतर पदाधिका:यांना ताब्यात घेऊन सुटका केली.  
 
सायन-पनवेल प्रस्तावित दर
वाहन प्रकारटोलचे दर
कार30 रुपये
मिनी बस, टेम्पो55 रुपये
ट्रक, बस110 रुपये
थ्री एक्सेल वाहन180 रुपये
मल्टि एक्सेल वाहन240 रुपये
या मार्गावरुन साधारण दिवसाला 
70 ते 80 हजार वाहने जातात. त्यामुळे दहा पदरी होताच त्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: 14 years on the Sion-Panvel route, Bharudad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.