पश्चिम रेल्वेवर १४0 सीसीटीव्हींची नजर

By admin | Published: December 26, 2016 05:04 AM2016-12-26T05:04:05+5:302016-12-26T05:04:05+5:30

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून पश्चिम, मध्य रेल्वेने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

140 cct at the Western Railway | पश्चिम रेल्वेवर १४0 सीसीटीव्हींची नजर

पश्चिम रेल्वेवर १४0 सीसीटीव्हींची नजर

Next

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून पश्चिम, मध्य रेल्वेने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विरारपुढील सात स्थानकांवर आधुनिक असे सीसीटीव्ही नसल्याने, सात स्थानकांवर १४0 सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे, तर अपघातग्रस्त प्रवाशांना स्थानकातच तत्काळ मदत मिळावी, यासाठी मध्य रेल्वेकडून १६ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येईल.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरक्षेविषयक अनेक बदल केले जात असून, यात इंटिग्रेटेड सिक्युरिटी अंतर्गत आधुनिक प्रकारचे सीसीटीव्ही बसविले जात आहेत. पश्चिम रेल्वे स्थानकांवर सध्याच्या घडीला भाडेतत्त्वावरील १ हजार ७१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यात पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी ४३२ नवीन सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन असेल. महत्त्वाची बाब म्हणजे, चर्चगेट ते विरारपर्यंत सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु विरारपुढील वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू रोड स्थानकात अत्याधुनिक असे सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना, रेल्वे सुरक्षा दलाला मोठी कसरत करावी लागते. हे पाहता विरारपुढील सात स्थानकांवर १४0 सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या सीसीटीव्हींची दर्जा सर्वोत्तम असेल. लवकरच सात स्थानकांवर
सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू केले जाईल. (प्रतिनिधी)
१६ स्थानकांमध्ये मिळणार मदत
च्पश्चिम रेल्वेने विरारपुढील प्रवाशांसाठी सुरक्षेविषयक निर्णय घेतलेला असतानाच, मध्य रेल्वेने अपघातग्रस्त प्रवाशांना स्थानकात वैद्यकीय मदत मिळावी, म्हणून वैद्यकीय कक्ष उभारण्याचा
निर्णय घेतला आहे. दादर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि कुर्ला येथे असे कक्ष काही महिन्यांपूर्वी उभारले.
च्आता आणखी १६ स्थानकांत कक्ष उभारण्यात येतील. यामध्ये भायखळा, सायन, विक्रोळी, भांडुप, कळवा, मुंब्रा, दिवा, अंबरनाथ, टिटवाळा, उल्हासनगर, कसारा, कर्जत, एलटीटी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या स्थानकाचा समावेश आहे. या कक्षात एक डॉक्टर, नर्स आणि मदतनीस असेल.

Web Title: 140 cct at the Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.