पात्रतेसाठी रातोरात १४० नव्या झोपड्या उभ्या

By Admin | Published: May 25, 2015 03:59 AM2015-05-25T03:59:35+5:302015-05-25T03:59:35+5:30

विमानतळालगत वसलेल्या झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याच्या बातमीचा सुगावा लागताच कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत झोपड्या

140 new huts vertically for eligibility | पात्रतेसाठी रातोरात १४० नव्या झोपड्या उभ्या

पात्रतेसाठी रातोरात १४० नव्या झोपड्या उभ्या

googlenewsNext

मुंबई : विमानतळालगत वसलेल्या झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याच्या बातमीचा सुगावा लागताच कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरमध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत झोपड्या उभारणीला वेग आला आहे. गेल्या काही रात्रींमध्ये या परिसरात झोपडपट्टीदादांकडून १४० हून अधिक झोपड्या उभारल्या असून, सर्व्हेमध्ये अधिकृत झोपड्यांच्या पात्रतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर नव्या झोपड्यांमुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अपर जिल्हाधिकारी (सक्षम प्राधिकारी) यांच्याकडून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील म्हणजे जरीमरी, संदेश नगर, क्रांती नगर आणि सेवक नगरमधील झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याचे काम १८ मे पासून हाती घेण्यात आले. हे काम करण्यासाठी घटनास्थळी दाखल होणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबंधित रहिवाशांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करावेत, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले. हे काम सुरू असतानाच कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीलगत आणि विमानतळाच्या भिंतीला लागून वसलेल्या क्रांती गरमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.
गेल्या काही रात्रींदरम्यान क्रांती नगरमध्ये अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या सर्व झोपड्या पत्र्याच्या असून, त्या पात्र करून घेण्यासाठी दलालांकडून तब्बल ८ लाखांची मागणी केली जात असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे कलिना विधानसभा सचिव राकेश पाटील यांनी दिली. वीज, पाणी उपलब्ध नसतानाही या झोपड्यांचा बोलबाला आहे. दलालांचा दबदबा असल्याने स्थानिक रहिवासी बोलण्यास कचरत आहेत. दरम्यान, पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन शासनातर्फे कुर्ला प्रीमिअर आॅटोमोबाइल परिसरात करण्याचे प्रस्तावित असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 140 new huts vertically for eligibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.