शेतकऱ्यांसाठी १४ हजार काेटींचा बूस्टर, बळीराजाच्या उत्पन्नवाढीला मिळेल बळ, कृषी क्षेत्रासाठी ७ महत्त्वपूर्ण याेजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:43 AM2024-09-03T09:43:40+5:302024-09-03T09:44:21+5:30

Maharashtra Government News: यावर्षी दमदार मान्सून बरसल्यामुळे देशातील शेतकरी सुखावला आहे. आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला खूश करणारी बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे १४ हजार काेटी रुपयांचा बूस्टर कृषी क्षेत्रासाठी जाहीर केला आहे.

14,000 crores booster for farmers, increase in income of Baliraja will get strength, cabinet approves 7 important schemes for agriculture sector | शेतकऱ्यांसाठी १४ हजार काेटींचा बूस्टर, बळीराजाच्या उत्पन्नवाढीला मिळेल बळ, कृषी क्षेत्रासाठी ७ महत्त्वपूर्ण याेजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी

शेतकऱ्यांसाठी १४ हजार काेटींचा बूस्टर, बळीराजाच्या उत्पन्नवाढीला मिळेल बळ, कृषी क्षेत्रासाठी ७ महत्त्वपूर्ण याेजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी

 नवी दिल्ली - यावर्षी दमदार मान्सून बरसल्यामुळे देशातील शेतकरी सुखावला आहे. आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला खूश करणारी बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे १४ हजार काेटी रुपयांचा बूस्टर कृषी क्षेत्रासाठी जाहीर केला आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी ७ महत्त्वाच्या याेजना जाहीर केल्या असून, त्यात डिजिटल कृषी मिशन आणि पीक विज्ञान याेजनांचा समावेश केला आहे. 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडविणारे तसेच त्यांचे उत्पन्न वाढविणारे ७ महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.  संशाेधन आणि शिक्षण, हवामान बदलाचा प्रतिकार, नैसर्गिक स्राेत व्यवस्थापन, कृषी क्षेत्राचे डिजिटायझेशन तसेच फलाेत्पादन आणि पशुधन विकासावर या याेजना केंद्रित आहेत. 

पीक विज्ञान
पीक विज्ञानामध्ये सहा प्रमुख स्तंभ बळकट करण्यावर भर दिला आहे. संशाेधन व शिक्षण, वनस्पती जनुकीय संसाधन व्यवस्थापन, अन्न व पिकांसाठी जनुकीय सुधारणा, डाळी व तेलबियांच्या पिकात सुधारणा, व्यावसायिक पिकांमध्ये सुधारणा तसेच कीटक, सूक्ष्मजीव, परागकण यावर संशोधन हे सहा स्तंभ बळकट करण्यात येणार आहेत. यासाठी ३,९७९ काेटी रुपयांची तरतूद केली आहे.

डिजिटल कृषी मिशन
या याेजनेसाठी २,८१७ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित विविध माहिती उपलब्ध हाेईल.

कृषी क्षेत्रात ‘एआय’
एआय, डिजिटल डीपीआय, रिमाेट इत्यादींचा वापर करून कृषी शिक्षण, व्यवस्थापन व समाज विज्ञान बळकट करण्यात येणार आहे. त्यात हवामान बदलाच्या प्रतिकाराचाही समावेश आहे. यासाठी २,२९१ काेटी मंजूर केले आहेत. 

इतर महत्त्वाच्या याेजना
१,७०२ 
काेटींची तरतूद पशूधन आराेग्य याेजनेसाठी. 
१,२०२ 
काेटी रुपयांची तरतूद कृषी विज्ञान केंद्रांसाठी
१,११५ 
काेटींची तरतूद नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन याेजनेसाठी
८६० 
काेटी रुपयांची तरतूद फळबागांच्या विकासासाठी.

 

Web Title: 14,000 crores booster for farmers, increase in income of Baliraja will get strength, cabinet approves 7 important schemes for agriculture sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.