१४०४ शाळांवर कारवाई; सर्वाधिक बोगस पटपडताळणी धुळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 12:03 AM2018-08-03T00:03:57+5:302018-08-03T00:04:18+5:30

राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे.

1404 School Action; Most bogus collapses in Dhule | १४०४ शाळांवर कारवाई; सर्वाधिक बोगस पटपडताळणी धुळ्यात

१४०४ शाळांवर कारवाई; सर्वाधिक बोगस पटपडताळणी धुळ्यात

- सुरेश लोखंडे

ठाणे : राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे. या शाळांनी कागदोपत्री जास्त विद्यार्थी संख्या दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक आदींवर फौजदारीच्या कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश आहेत. मात्र, अंमलबजावणीस विलंब होत असल्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत.
सुमारे सात वर्षांपूर्वी महसूल विभागाने खोटी पटसंख्या नोंदविणाºया शाळांची पटपडताळणी केली आहे. राज्यभरातील ३५ जिल्ह्यांमधील शाळांत ती सलग तीन दिवस करण्यात आली. यातून एक हजार ४०४ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बोगस पटसंख्या नोंदविल्याचे निदर्शनात आहे. राज्यभरातून केवळ दीड लाख विद्यार्थी बोगस असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही विद्यार्थी संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
या पटपडताळणीमध्ये राज्यभरातील एक हजार ४०४ शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटसंख्या आढळली. त्यामधील विद्यार्थी संख्या दीड लाखापेक्षा नक्कीच जास्त असण्याची शक्यता आहे. खोटी पटसंख्या नोंदविणाºया राज्यात सर्वाधिक धुळे जिल्ह्यात सुमारे ३९४ शाळा आढळल्या. यात जिल्हा परिषदेच्या १७ शाळा आहेत. याखालोखाल नांदेड जिल्ह्यात १७७ शाळा असून त्यात २७ जिल्हा परिषदेच्या आहेत. तर, जळगाव जिल्ह्यातील ११८ शाळांमध्ये जि.प.च्यादेखील १७ शाळा आहेत. नागपूरला १२७ शाळा असून त्यात जि.प.च्या १४ आहेत. सोलापूरच्या ११५ शाळांमध्ये जि.प.च्यादेखील नऊ, तर रायगडमधील ११८ शाळा असून आठ जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र शंभरपेक्षा कमी शाळांचा समावेश असून त्यातही महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि आश्रमशाळांचा व अनुदानित-विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांचा समावेश आहे.

खोटी विद्यार्थी पटसंख्या नोंदवलेल्या ३५ जिल्ह्यांमधील शाळांची संख्या

जिल्हा शाळा
ठाणे ७५
रायगड ११०
कोल्हापूर ००५
सांगली ००७
सातारा ०११
रत्नागिरी ००७
सिंधुदुर्ग ००९
लातूर ०७१
नांदेड १७७
उस्मानाबाद ०१४
औरंगाबाद ०५५
बीड ०३८
हिंगोली ००६
जालना ०३०
परभणी ०५७
सोलापूर ११५
नंदुरबार ०४८
धुळे ३९४
जळगाव ११८
नाशिक ०३३
बुलडाणा ०१५
यवतमाळ ०२३
भंडारा ०१३
गोंदिया ०१३
वर्धा ००८
नगर ०१३
चंद्रपूर ०४२
पुणे ०३२
वाशिम ०१२
अमरावती ०२३
अकोला ०२२
मुंबई ०५२
नागपूर १२७
गडचिरोली ०३७
पालघर ००३

- राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांची पडताळणी झाली. त्यातील२० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांमध्ये सुमारे १० टक्के विद्यार्थ्यांची नोंद बोगस असल्याचे उघड झाले.
- पालघर जिल्ह्यात केवळ तीन शाळा, तर ठाण्यामध्ये सुमारे ७५ शाळा बोगस विद्यार्थी पटसंख्या नोंदविणाºया असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

Web Title: 1404 School Action; Most bogus collapses in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा