१,४३५ पाणी पुरवठा योजनांची वीज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:07 AM2017-07-19T02:07:19+5:302017-07-19T02:07:19+5:30
महावितरण कंपनीने ९ ते १९ मे दरम्यान औरंगाबाद परिमंडळातील सुमारे ९०० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरण कंपनीने ९ ते १९ मे दरम्यान औरंगाबाद परिमंडळातील सुमारे ९०० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १४३५ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापले आहे.
५७ कोटी ९३ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी कंपनीने पाणीपुरवठा योजनांना कारवाईचा शॉक दिला आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. योजनांच्या बिलांबाबत जिल्हा परिषदेने गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंचांवर जबाबदारी टाकून हात वर केले आहेत, तर महावितरण कंपनीने व्याज व दंडाची रक्कम वगळता मूळ वीज बिल भरले तरच वीजपुरवठा सुरळीत करण्याची भूमिका घेतल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले, जि. प. सीईओंना भेटून वीज बिलांची मागणी केली होती.