मिळकतकरात १४.५ कोटींची वाढ
By admin | Published: November 5, 2016 01:28 AM2016-11-05T01:28:46+5:302016-11-05T01:28:46+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने आॅक्टोबरअखेर २६० कोटींच्या मिळकत कराची वसुली केली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने आॅक्टोबरअखेर २६० कोटींच्या मिळकत कराची वसुली केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत साडेचौदा कोटींची अधिक वसुली झाली आहे. मिळकत कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
शहरातील मिळकतकराचा भरणा रोख व डीडीद्वारे एकूण १ लाख ३२ हजार, धनादेशाद्वारे ३६ हजार ३०० व आॅनलाइनद्वारे ७० हजार ३०० मिळकतधारकांनी कर भरला आहे. सप्टेंबरअखेर थकबाकीसह पहिल्या सहामाहीची रक्कम भरणा न केलेल्या मिळकधारकांना २ टक्के प्रतिमहा दराने मनपा शास्तीकर आकारण्यात येणार आहे. तसेच ३१ डिसेंबर २०१६ अखेर दुसऱ्या सहामाहीची रक्कम भरणा न केल्यास दुसऱ्या सहामाही रकमेवरही २ टक्के प्रतिमहा दराने मनपा कर शास्तीची आकारणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
>नोव्हेंबर २०१६ मध्ये थकबाकी असलेल्या सर्व मिळकतधारकांना मागणीपत्र बजावण्यात येणार आहेत. आर्थिक वर्षात जप्ती अधिपत्र बजाविण्यात आलेल्या ज्या थकबाकीदारांनी अद्यापही मिळकत कराचा भरणा केलेला नाही, अशा थकबाकीदारांच्या मिळकतींची जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
- दिलीप गावडे, सहआयुक्त