राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 08:46 PM2020-08-27T20:46:17+5:302020-08-27T20:55:02+5:30
२४ तासांत राज्यात ९ हजार १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १४ हजार ७१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३३ हजार ५६८ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, २४ तासांत राज्यात ९ हजार १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ७२.४६ टक्के इतके झाले आहे.
14,718 new #COVID19 cases and 355 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,33,568 including 5,31,563 recoveries and 23,444 deaths. Number of active cases 1,78,234: State Health department pic.twitter.com/iFWUuhfBoQ
— ANI (@ANI) August 27, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३८ लाख ६२ हजार १८४ नमुन्यांपैकी ७ लाख ३३ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख २४ हजार २३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.
आज निदान झालेले १४,७१८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३५० (३०), ठाणे- २३८ (१२), ठाणे मनपा-१८३ (१), नवी मुंबई मनपा-४०५ (११), कल्याण डोंबिवली मनपा-२७८, उल्हासनगर मनपा-२१, भिवंडी निजामपूर मनपा-१६ (१), मीरा भाईंदर मनपा-१८९ (६), पालघर-१३० (२), वसई-विरार मनपा-१७६, रायगड-३०५ (१३), पनवेल मनपा-२१४ (७), नाशिक-२१९ (१५), नाशिक मनपा-७४० (१६), मालेगाव मनपा-४६ (१), अहमदनगर-३४७ (४),अहमदनगर मनपा-२५८ (४), धुळे-७२, धुळे मनपा-७८ (१), जळगाव- ६०३ (७), ९जळगाव मनपा-९४ (३), नंदूरबार-१४३ (३), पुणे- ८१९ (१२), पुणे मनपा-१७७२ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-१०८५, सोलापूर-२५१ (१४), सोलापूर मनपा-५६ (४), सातारा-५३२ (२), कोल्हापूर-३५२ (२२), कोल्हापूर मनपा-१५१ (५), सांगली-२४७ (११), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७६ (६), सिंधुदूर्ग-१८, रत्नागिरी-६४, औरंगाबाद-१३५ (१),औरंगाबाद मनपा-११९ (५), जालना-४३ (४), हिंगोली-५९ (१), परभणी-४८, परभणी मनपा-२५, लातूर-८५ (२), लातूर मनपा-१२८ (१), उस्मानाबाद-४९ (४),बीड-५६ (२), नांदेड-१११ (१८), नांदेड मनपा-१८२ (१३), अकोला-४२ (२), अकोला मनपा-१२, अमरावती-४५, अमरावती मनपा-८६ , यवतमाळ-११७ (२), बुलढाणा-६७ (२), वाशिम-२८, नागपूर-१५२ (२), नागपूर मनपा-१०८६ (३४), वर्धा-४१ (३), भंडारा-३९ (४), गोंदिया-६५, चंद्रपूर-७४, चंद्रपूर मनपा-४९, गडचिरोली-२५, इतर राज्य २२ (३).
आणखी बातम्या...
उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत
घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...