मुंबईत 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 'या' रुग्णालयातील तब्बल 80 जण संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 05:52 PM2020-04-19T17:52:38+5:302020-04-19T18:04:23+5:30

बॉम्बे रुग्णालयात 2 नवे रुग्ण आढळले आहेत आणि हे दोघेही येथील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12वर पोहोचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले आहेत. यासर्व रुग्णालयातील नर्स आहेत.

148 medical staff found corona positive in mumbai sna | मुंबईत 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 'या' रुग्णालयातील तब्बल 80 जण संक्रमित

मुंबईत 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 'या' रुग्णालयातील तब्बल 80 जण संक्रमित

Next
ठळक मुद्देअनेक रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणवॉकहार्ट रुग्णालयात 26 नवे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेतराज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 हजार 690 वर

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे जवळपास 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समजते. तर अद्याप तपासणीनंतर अनेकांचा अहवाल येणे बाकी आहे. वॉकहार्ट रुग्णालयात 26 नवे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत आणि हे सर्व येथील वैद्यकीय कर्मचारी आहेत. आतापर्यंत या रुग्णालयातील जवळपास 80 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

अनेक रुग्णालयांत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण -
बॉम्बे रुग्णालयात 2 नवे रुग्ण आढळले आहेत आणि हे दोघेही येथील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12वर पोहोचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले आहेत. यासर्व रुग्णालयातील नर्स आहेत. तर भाटिया रुग्णालयात एकूण 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

वॉकहार्ट रुग्णालयातील आकडा वाढतोय -
गेल्या 6 एप्रिलला वॉकहार्ट रुग्णालयातील 150हून अधिक कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथे एक 70 वर्षी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला होता. या रुग्णाची देखभाल करणाऱ्या दोन नर्सना सर्वप्रथम कोरोनाचा लागण झाली आणि कोरोनाने हाळू-हळू अनेकांना आपल्या विळख्यात घेतले. यानंतर बीएमसीने हे रुग्णालय सील करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेय -
राज्यात शनिवारी तब्बल 328 कोरोना रुग्णांचे निदान झाले, यातील एकट्या मुंबईत 284 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 हजार 690 वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण 2 हजार 268 कोरोना रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 216 झाली आहे, तर मुंबईत ही संख्या 126 इतकी आहे.

देशात आतापर्यंत 15,712हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 1334 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

Web Title: 148 medical staff found corona positive in mumbai sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.