भिवंडीत सापडली १४८० लीटर दारू
By admin | Published: June 26, 2015 02:37 AM2015-06-26T02:37:19+5:302015-06-26T02:37:19+5:30
शहरालगत कालवार गावात शेतकऱ्याच्या गोठ्यात लपविलेली १४८० लीटर दारू व दारू बनविण्याचे सामान उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने
भिवंडी : शहरालगत कालवार गावात शेतकऱ्याच्या गोठ्यात लपविलेली १४८० लीटर दारू व दारू बनविण्याचे सामान उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले. राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे व भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मिळून केलेल्या संयुक्त कारवाईत गुरुवारी कालवार गावात जनावरे बांधण्याच्या गोठ्यात सुकलेल्या गवताखाली १४८० लीटर दारू असलेले ३७ प्लास्टिक कॅन तसेच दारू बनविण्यासाठी लागणारे ६०० लीटर रसायन जप्त केले. मात्र, गोठ्याचा मालक पळून गेला.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाचे प्रमुख सुभाष जाधव यांना खर्डी येथील काशिनाथ नाना पाटील चाळी छापा टाकून एका घरामध्ये ३५ लीटरचे १० कॅन भरलेली गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी रामभरोसे पासवान (३५) आणि बासदेव यादव (५२) या दोघांना अटक केली, तर मूळ मालक राकेश पाटील हा फरार झाला.