कॅम्पा कोलावासीयांना 15 दिवसांचा दिलासा
By admin | Published: July 9, 2014 01:34 AM2014-07-09T01:34:50+5:302014-07-09T01:34:50+5:30
वरळीतील कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील अनधिकृत मजल्यांवर राहणा:या 9क् कुटुंबाना 15 दिवसांचा दिलासा मिळाला आहे.
Next
मुंबई : वरळीतील कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील अनधिकृत मजल्यांवर राहणा:या 9क् कुटुंबाना 15 दिवसांचा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 15 दिवसांनंतर होणार असल्याने पालिकेतर्फे दुस:या टप्प्यातील कारवाईला स्थगिती देण्यात आल्याचे समजते.
याबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पालिकेला कारवाईसाठी बळाचा वापर करता येणार नाही, असे फटकारले. तर कारवाई ही न्यायालयाच्या आदेशाने होत असल्याने रहिवाशांनी आंदोलन किंवा विरोध करू नये, अशा स्पष्ट शब्दांत न्यायालयाने रहिवाशांनाही सुनावले आहे. दरम्यान कारवाईबाबत कोणतेही स्पष्टीकरण हवे असल्यास रहिवाशांनी न्यायालयात अर्ज करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान पहिल्या टप्प्यात पालिकेने येथील अनधिकृत ठरवलेल्या 9क् घरांचा वीज, पाणी आणि गॅस पुरवठा खंडीत केला होता. त्यानंतर दुस:या टप्प्यात रहिवाशांना घराबाहेर काढून घरांच्या भिंती तोडण्याचे काम सुरू करण्यात येणार होते. मात्र पुढील सुनावणी दोन आठवडय़ानंतर होणार असल्याने तोर्पयत तरी दुस:या टप्प्यातील कारवाई होणार नसल्याचे समजते. (प्रतिनिधी)