धनगर आरक्षणाचा निर्णय १५ दिवसांत

By admin | Published: January 5, 2015 06:45 AM2015-01-05T06:45:47+5:302015-01-05T06:45:47+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने आगामी १५ दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला

In 15 days, the decision of Dhanagara reservation | धनगर आरक्षणाचा निर्णय १५ दिवसांत

धनगर आरक्षणाचा निर्णय १५ दिवसांत

Next

नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने आगामी १५ दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आयोजित आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक भूमिकेत होता व त्याचा प्रत्यय उपस्थित नागरिक आणि व्यासपीठावरील नेत्यांच्या भाषणातूनही व्यक्त होत होता. हा मूड लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी दिलेल्या शब्दावर आम्ही ठाम आहोत. घाईघाईने हा निर्णय घेतल्यास मराठा आरक्षणाप्रमाणे न्यायालयात तो टिकणार नाही. म्हणून याला कायदेशीर चौकटीत बसविण्यासाठी येत्या १५ दिवसांत धनगर समाजाच्या नेत्यांसोबत राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल व त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. याप्रसंगी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सरकारमध्ये राहून याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले, तर महादेव जानकर यांनी नवीन सरकारला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती उपस्थितांना केली. (प्रतिनिधी)

Web Title: In 15 days, the decision of Dhanagara reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.