मुंबई-गुजरात महामार्गावरील वरसावे पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद

By admin | Published: September 3, 2016 08:14 PM2016-09-03T20:14:01+5:302016-09-03T20:14:01+5:30

१९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे

15 days off for repair of Versova bridge on Mumbai-Gujarat highway | मुंबई-गुजरात महामार्गावरील वरसावे पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद

मुंबई-गुजरात महामार्गावरील वरसावे पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद

Next
>- राजू काळे / ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 3 - केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हि दुरुस्ती गणेशोत्सवानंतर सुरु होणार असल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक जुन्या पुलावरून तसेच चिंचोटी मार्गे वळविण्यात येणार आहे. 
 
महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर केंद्र व राज्य सरकारने बांधलेल्या वाहतूक पुलांच्या  स्ट्रक्टरल ऑडिटला सुरुवात झाली. तत्पूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये १९९५ मध्ये बांधण्यात आलेल्या वारसावे पुलालगत असलेल्या ४३ वर्षे जुन्या पुलाच्या गर्डरला तडा गेल्याने हा पूल तब्बल दिड वर्षे बंद ठेवण्यात आला होता. यामुळे घोडबंदर व गुजरात महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. येथील वाहतूक कोंडीचे नियोजन  करण्यासाठी २४  तास वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. यावेळी गुजरातकडे जाणारी अवजड वाहतूक ठाणेमार्गे भिवंडी येथून वळविण्यात आली तर हलकी वाहने लगतच्या पुलावरून सोडण्यात आली. सध्या या पुलाची तपासणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. तर नवीन  पुलाच्या दुरुस्तीचे काम  हाती घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. 
सध्या गणेशोत्सवाचा सण सुरु होणार असल्याने दुरुस्तीला  गणेशोत्सवानंतर सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे १५ दिवस पुलाच्या  दुरुस्तीसाठी देण्यात आले असून ती आयआरबीमार्फत  होणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक वसईच्या चिंचोटीमार्गे भिवंडीकडे वळविण्यात येणार असून त्यात अवजड वाहतुकीचा समावेश आहे.  हलकी वाहने  लगतच्या जुन्या पुलावरून सोडण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईहून गुजरात व वसई-विरारकडे जाणाऱ्या तसेच  वसई-विरारमार्गे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीची प्रचंड कोंडी होणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे  प्रभारी व्यवस्थापक  दिनेश अग्रवाल म्हणाले, सध्या घडणाऱ्या दुर्घटनांमुळे  प्रसंगावधान राखूनच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम म्हणाले, पुलाच्या दुरुस्तीदरम्यान होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या नियोजनासाठी मुंबई, पालघर, ठाणे शहर व ग्रामीण वाहतूक शाखांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दुरुस्तीला इवलम्ब होण्याची शक्यता गृहीत धरता त्यादरम्यान  चालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या पत्रानुसार सुरुवातीला जुना पुल वाहतुकीसाठी त्वरीत बंद करून त्याच्या दुरूस्तीला सुरुवात करण्याबाबत कळविण्यात आले असल्याचं ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर बोलले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात पुलाकडील वाहतुकीच्या नियोजनासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परंतु, मागील घटना पाहता जुन्या पुलाची दुरुस्ती आवश्यक बनल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना नाईलाजास्तव धावपळ करावी लागणार आहे. 
 
 

Web Title: 15 days off for repair of Versova bridge on Mumbai-Gujarat highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.