सहा अपघातांत १५ जखमी

By admin | Published: November 2, 2016 05:24 AM2016-11-02T05:24:04+5:302016-11-02T05:24:04+5:30

रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीत गेल्या दोन दिवसांत झालेल्या वाहन अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

15 injured in six accidents | सहा अपघातांत १५ जखमी

सहा अपघातांत १५ जखमी

Next


अलिबाग : रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीत गेल्या दोन दिवसांत झालेल्या वाहन अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
रविवारी माणगाव तालुक्यातील वडगाव कोंड येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मधू शिवाजी लाकेश्री, विनोद केशव गावडे व अन्य एक असे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री १२.१५ वाजता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक नडगावच्या हद्दीत नदीपात्रात उलटून अपघात झाला. यात ट्रकचालक जखमी झाला असून त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी तिसरा अपघात संध्याकाळी ७.३० वाजता एका दुचाकीला नेरळ-दहवली गावाजवळ हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झाला. अपघातात साहिल मुश्ताक नाचण आणि मुसिद्दक रियाज बोंबे (रा. चिकन पाडा) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण येथे औषधोपचार चालू आहेत. रविवारी चौथा अपघात दुपारी चार वाजेच्या सुमारास नेरळजवळच्याच मरिचुलवाडी फाटा येथे झाला. टेम्पो चालकाने पादचाऱ्यास धडक मारून हा अपघात केला. अपघातात मारु ती भाऊ मेंगाळ (रा. मरिचुलवाडी, ता.कर्जत) हे जखमी आहेत. रविवारी पाचवा अपघात दुपारी २.३० वाजता मुंबई-गोवा हायवेवर लोहारे गावचे हद्दीत घडला. इनोव्हा कारचालकाने धडक दिल्याने पादचारी विश्वास रामचंद्र भोसले (रा.लोहारे पवारवाडी, ता.पोलादपूर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे औषधोपचार चालू आहेत.
सोमवारी मुंबई-पुणे जुन्या हायवेवर सकाळी ११.४५ वाजता रिक्षाचे ब्रेक नादुरुस्त होऊन झालेल्या अपघातात शकील शेख, फातिमा अख्तर नाखुदा, रितू महबूब शेख, उमीर समीर शेख, मोहीन अख्तर नाखुदा, महेक अख्तर नाखुदा, समीर जागीर शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालय व एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे औषधोपचार चालू आहेत. या अपघात प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
>उरणहून पनवेलकडे निघालेल्या इर्टिगा कारला चिंचपाडा गावाजवळ कंटेनरने दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला. भाऊबीजेसाठी निघालेल्या या कुटुुंबातील सात वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलमधील गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: 15 injured in six accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.