एसटी अपघातात १५ जण जखमी
By admin | Published: May 17, 2016 02:29 AM2016-05-17T02:29:42+5:302016-05-17T02:29:42+5:30
मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारी एसटी सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका झाडाला धडकून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले.
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील औंढे गावच्या हद्दीत मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारी एसटी सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका झाडाला धडकून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील धनेगाव (धाकटी पंढरी) येथून ४५ प्रवासी घेऊन चाळीसगाव आगाराची एसटी बस (एमएच १४ बीटी ४७१०) दुपारी द्रुतगती महामार्गावरून बोरिवली, मुंबई येथे जात असताना औंढे गावाजवळ एसटीला ओव्हरटेक करणाऱ्या एका मोटारीने कट मारला, अशी माहिती चालक एस.जी. नागरगोजे यांनी दिली.
अपघातात सोहेल राजमहंमद शेख (वय १५,रा. मलाड, मुंबई), संतोष पांडुरंग काकडे (४०, रा. बेलापूर रोड, ठाणे) व अन्य एक जण गंभीर जखमी झाला. किरकोळ जखमीमध्ये जगन्नाथ कृष्णाप्पा कोटियान (४५), शैला जगन्नाथ कोटियान (३५, रा. वल्लभनगर, पिंपरी), राजमहंमद जमादार शेख (४५), रमिजा जब्बार पठाण (६५), शबनम राजमहंमद शेख (२०), शबिना राजमहंमद शेख (१९, सर्व रा. मालाड, मुंबई), आम्रपाली दिशेन सोनवणे (१९), सागरबाई मोहन सोनवणे (२१), दिनेश मोहन सोनवणे (२२, रा. बोरिवली), पूजा मोहन सुरवसे (१९) व कोंडाबाई नागनाथ सुरवसे (७०, दोघी रा. जामखेड), रोहन संतोष काकडे (१५), सविता संतोष काकडे (३८, दोघेही रा. बेलापूररोड, ठाणे) याचा समावेश आहे. (वार्ताहर)