धनंजय देसाईसह १५ निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 04:06 AM2017-04-26T04:06:35+5:302017-04-26T04:06:35+5:30

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय ४०, रा. हिंदूगड मु. पो. पौड, ता. मुळशी) यांच्यासह इतर १५ आरोपींची

15 innocent with Dhananjay Desai | धनंजय देसाईसह १५ निर्दोष

धनंजय देसाईसह १५ निर्दोष

Next

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय ४०, रा. हिंदूगड मु. पो. पौड, ता. मुळशी) यांच्यासह इतर १५ आरोपींची खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून जिल्हा न्यायाधीश एस. जी. गिमेकर यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
विनायक सुरेश चव्हाण (वय २४ रा. जनता वसाहत, जनवाडी), किरण कृष्णा बांद्रे (वय ३६), योगेश बाबासाहेब मानकर (वय २८), रवी मल्लेश जेल्ली (वय २६), दशरथ बाळू चव्हाण (वय २६), विजय आत्माराम तेरकर (वय ३४), मंगेश वसंत धुमाळ (वय ३०), सचिन शंकर बांदरे (वय ३३), दादासाहेब महादेव बारगजे (वय ३०), देवेंद्र दशरथ भंडारे (वय २८), राम विठ्ठल वाघमारे (वय २९), बाळा दत्तात्रय येळवंडे (वय ३३), शरद अंकुश नामदास (वय २८), संजय आत्माराम तेरकर (वय ३०, सर्व रा. जनवाडी जनता वसाहत) व धनंजय देसाई अशी निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे आहेत.
मिलिंद पवार व भालचंद्र पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, की देसाई यांनी कटकारस्थान केले व गुन्हा घडविला असा पोलिसांनी पूर्णपणे खोटा आरोप करून जाणीवपूर्वक या गुन्ह्यात गुंतविले. घटनेच्या वेळी देसाई घटनास्थळी नव्हते. तो ग्राह्य धरून सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली. दरम्यान हडपसर येथील मोहसीन शेख खूनप्रकरणी देसाई आरोपी असून, येरवडा कारागृहात आहे. या खून खटल्याची सुनावणी अद्याप येथील न्यायालयात सुरू आहे. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांना दिली हत्यारे-
४जनवाडी येथील कार्यकर्त्यांनी १८आॅक्टोबर ११ रोजी जनता वसाहत जनवाडी येथे धनंजय देसाई यांची सभा आयोजित केली होती. सभेनंतर जनता वसाहत येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदू राष्ट्र सेनेचा बोर्ड लावला होता. वसाहतीमधील बबलू व जावेद कार्यकर्त्यांना विरोध करत होते. ही बाब या कार्यकर्त्यांनी देसाई यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना सांगितली. तेव्हा त्यांचा काटा काढा मी कोर्टकचेरीचे बघून घेतो, असे आदेश देसाई यांनी कार्यकर्त्यांना दिले व कार्यकर्त्यांना हत्यारे दिली होती, असा सरकार पक्षाचा आरोप होता.
४दि २ जानेवारी २०१२ रोजी रात्री १०.३० वाजता आरोपी व इतर काही अनोळखी लोकांनी बबलू ऊर्फ ईर्शाद मोहंमद हकीम खान (वय ३२) व जावेद मोहंमद हकीम खान (वय ३३) यांच्यावर रॅम्बो चाकू व चॉपरने वार केले व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली होती. कटकारस्थान केल्याचा आरोप असलेल्या देसाई यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.

Web Title: 15 innocent with Dhananjay Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.