विदेशी पर्यटनाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक
By admin | Published: June 21, 2016 05:55 PM2016-06-21T17:55:57+5:302016-06-21T17:55:57+5:30
विदेशी पर्यटनाचे आमिष दाखवून मांडसांगवी येथील एकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अहमदाबाद
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 21 - विदेशी पर्यटनाचे आमिष दाखवून मांडसांगवी येथील एकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अहमदाबाद येथील पारस यादव याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांडसांगवी येथील ज्ञानेश्वर कारभारी पैठणकर (४६, मुक्ताई निवास) यांच्यासह त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला विदेशात पर्यटनासाठी जायचे होते़. या दोघांना संशयित पारस यादव (शॉप नंबर ३, ऊर्जा मोटेरा कॉम्प्लेक्स, शहानंद पार्कच्या समोर, स्टेडियम रोड, मोटेरा, अहमदाबाद) याने मी तुम्हाला विदेशातील पटाया येथे पर्यटनासाठी घेऊन जातो, असे सांगितले़ तसेच २५ एप्रिल २०१६ ते २७ एप्रिल २०१६ या कालावधीत १ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यावर भरण्यास सांगितली़ त्यानुसार या दोघांनी पैसे भरले मात्र पर्यटनाला न देता यादवने या दोघांचीही फसवणूक केली़.
संशयित पारस यादव हा एका गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़. दरम्यान, नाशिक पोलीस येत्या दोन दिवसांत त्याचा ताबा घेण्यासाठी पुणे येथे जाणार आहेत़.