उजनीत अवघा १५ टक्के साठा

By admin | Published: April 7, 2017 01:05 AM2017-04-07T01:05:09+5:302017-04-07T01:05:09+5:30

मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे.

Up to 15 percent of the sunlight | उजनीत अवघा १५ टक्के साठा

उजनीत अवघा १५ टक्के साठा

Next

बारामती : मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे. धरणाच्या उपयुक्त साठ्यामध्ये सध्या केवळ १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने धरणातील पाणीसाठा वापरावा लागणार आहे.
उजनी धरणाला नेहमीच ढिसाळ नियोजनाचा फटका बसतो. सोलापूर जिल्ह्याला नदी व कालव्याद्वारे वर्षभर अनियंत्रित पाणी सोडले जाते. तसेच, या जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींच्याही दबावाला येथील धरणप्रशासन बळी पडते. सध्या धरणामध्ये १५ टक्के पाणीसाठा आहे.
साहजिकच पुणे, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्ह्यातील धरणकाठच्या गावांमध्येच पाणी टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. उजनी धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने जलाशयाचा भाग उघडा पडला आहे. याचा फटका जलाशयाच्या काठच्या गावांना आणि शेतीला बसणार आहे. तसेच, धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना देखील पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये सलग पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. सध्या उन्हाचा काडाका जास्त असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे देखील धरणाच्या पाणीपातळीत घट होणार आहे.
उजनी हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. तसेच, भीमा खोऱ्यातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही उजनीचा उल्लेख होतो. पुण्यातील बहुतांश धरणांमधील पाणी अखेरच्या टप्प्यात उजनीत सोडले जाते. २०१५ मध्ये उजनीधरण तीव्र दुष्काळामुळे कधी नव्हे तेवढ्या नीचांकी पातळीवर गेले होते. २०१६ मध्ये पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात धरण पूर्णक्षमतेने भरले गेले. धरणात तब्बल ११० टक्के पाणीसाठा झाला. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे उजनी धरण काठोकाठ भरूनदेखील अवघ्या सहा-सात महिन्यांतच कोरडे पडू लागते.
उजनीच्या कालव्यातून मागील दीड महिन्यापासून सोलापूरला पाणी सोडले आहे. धरणातील पाणीपातळी ४९२.१८५ मीटर आहे, तर एकूण साठा २ हजार ४३.६२ दशलक्ष घनफूट आहे, तर धरणातील उपयुक्तसाठा केवळ ८.५० टीएमसी एवढाच शिल्लक आहे. धरण परिसरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या आसपास आहे. पुढेही दोन महिने तीव्र उन्हाळा असणार आहे.

Web Title: Up to 15 percent of the sunlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.