स्मार्ट शहरांसाठी हवेत १५० अब्ज डॉलर
By Admin | Published: February 1, 2016 02:22 AM2016-02-01T02:22:48+5:302016-02-01T02:22:48+5:30
केंद्र सरकारच्या देशात १०० शहरे स्मार्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी येत्या काही वर्षांत १५० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे
मुंबई : केंद्र सरकारच्या देशात १०० शहरे स्मार्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी येत्या काही वर्षांत १५० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे व त्यात खासगी क्षेत्राचा मोठा वाटा असेल. डिलाईटने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार या १५० अब्ज डॉलरपैकी १२० अब्ज डॉलर खासगी क्षेत्रातील असतील.
सरकारने याआधीच ७.५१ अब्ज डॉलरच्या प्रारंभिक खर्चासह स्मार्ट शहर मिशन आणि अटल मिशन फॉर रिजुविनेशन आॅफ अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन (अमृत) सुरू केले आहे. याद्वारे सध्या ५०० शहरांचा दर्जा सुधारला जात आहे. डिलाईट इंडियाचे वरिष्ठ संचालक पी.एन. सुदर्शन म्हणाले की, या शहरांना निधी कुठून द्यायचा हाच काळजीचा विषय आहे; परंतु स्मार्ट शहर प्रकल्पाचे व्यवस्थापन सरकारची निर्णय प्रक्रिया, धोरणे, नियामकीय रचना यासाठी आव्हानच आहे.