मुगलकालीन रत्नहारासाठी मोजले १५० कोटी!
By admin | Published: May 15, 2014 05:34 PM2014-05-15T17:34:52+5:302014-05-15T17:34:52+5:30
लिलावामध्ये रत्नहारासाठी तब्बल २.३७९ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास दीडशे कोटी रूपये हॅरी विन्सटन या कंपनीच्या सीईओ नायला हायक यांनी मोजले.
Next
>
ऑनलाइन टीम
जिनिव्हा , दि. १५ - जगप्रसिध्द मुगल काळातील दुर्मिळ रत्नहाराचा लिलाव बुधवारी संपन्न झाला. या लिलावामध्ये रत्नहारासाठी तब्बल २.३७९ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास दीडशे कोटी रूपये हॅरी विन्सटन या कंपनीच्या सीईओ नायला हायक यांनी मोजले. अमेरिकन असलेली हॅरी विन्सटन ही कंपनी दागिने आणि घडी बनवणा-यासाठी प्रसिध्द आहे.
रत्नहार खरेदी केल्यानंतर हायक म्हणाल्या की, २०१३ या वर्षी आम्ही हॅरी विन्सटन कंपनी खरेदी केली होती. त्यानंतर दुर्मिळ रत्नहार खरेदी करावी यासाठी आपले प्रयत्न होते. मुगल काळातील हा रत्नहार खरेदी केल्याने आपल्याला खूप मोठा गर्व आणि आनंद होत असल्याचे हायक म्हणाल्या.
मॅग्निफिसंट ज्वेल्स या नावाने केलेल्या विक्रीत १७ व्या शतकातील सात मुगलकालीन रत्नहार आहेत. त्यावर बादशहांची नावे कोरण्यात आलेली आहेत. यांची किंमत १ लाख ५० हजार डॉलरपासून, २० लाख डॉलरपर्यंत आहे. मुगल बादशहांना रत्नांचे आकर्षण होते. मुगलांचे पूर्वज तिमुरिद यांच्या कालावधीपासून रत्नहारांवर नाव कोरण्याची प्रथा चालू होती. मुगल बादशहा आपल्याकडील हिरा, पन्ना अशा मौल्यवान रत्नावर आपले नाव कोरत असत व ही रत्ने हारात जडविली जात असत. हे रत्नहार साम्राज्याच्या समृद्धीचे प्रतीक होते, तसेच सुरक्षेसाठी त्यावर ताईतही बांधले जात असत. कतार येथील इस्लामिक कला संग्रहालयात एक रत्नहार असून त्यात ११ मुगलकालीन रत्ने जडविण्यात आली आहेत. त्यांचे एकूण वजन ८७७.२३ कॅरट असून, या रत्नापैकी तीन रत्नावर मुगल बादशहा जहांगीर व एका रत्नावर शहेनशहा शहाजहान याचे नाव आहे.