विकास हस्तांतरण अधिकार विकून १५० कोटींचे उत्पन्न?

By admin | Published: June 26, 2015 02:42 AM2015-06-26T02:42:33+5:302015-06-26T02:42:33+5:30

गोरेगाव आणि जोगेश्वरीमधील निरलॉन, नेस्को व आजगावकर प्लॉटवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या ३० हजार चौ.मी. जागेचा

150 crores by selling development transfer rights? | विकास हस्तांतरण अधिकार विकून १५० कोटींचे उत्पन्न?

विकास हस्तांतरण अधिकार विकून १५० कोटींचे उत्पन्न?

Next

मुंबई : गोरेगाव आणि जोगेश्वरीमधील निरलॉन, नेस्को व आजगावकर प्लॉटवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या ३० हजार चौ.मी. जागेचा विकास हस्तांतरण अधिकार विकल्यामुळे मुंबई एमएमआरडीएला १५३ कोटी ९८ लाख ८ हजार १४ रुपये इतके उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
निरलॉन प्लॉटसाठी दर चौरस मीटर ५२ हजार तर नेस्को प्लॉटसाठी दर चौरस मीटर ५१ हजार रुपये आणि आजगावकर प्लॉटसाठी ५१ हजार २५ रुपये इतकी बोली लागली आहे.
विकास हस्तांतरण अधिकारासाठी १४ कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. सरोज लॅण्डमार्क, कुणाल रियेल्टरस, अ‍ॅरिस्टो रियाल्टी डेव्हलपर्स, भूमी कन्स्ट्रवेल, स्प्रेड रियाल्टर्स, सफायर लॅण्ड डेव्हेलपमेंट, आकाश युनिव्हर्सल, बाल्जी सेजपाल अ‍ॅण्ड कंपनी, स्टील प्लान्ट, स्ट्रीम लाईन फायनान्स अ‍ॅण्ड इनव्हेस्टेमेंट, ब्ल्यू डायमंड कन्स्ट्रक्शन, आॅबेरॉय रियाल्टी या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. यशस्वी निविदाकारांची घोषणा येत्या ४ आठवड्यांत करण्यात येणार आहे.

Web Title: 150 crores by selling development transfer rights?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.