९० हजार कर्मचाऱ्यांचे १,५०० कोटी एसटीने थकविले; पीएफ, उपदानाची रक्कम ट्रस्ट अडचणीत येण्याचा धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 06:06 AM2024-07-22T06:06:01+5:302024-07-22T06:06:10+5:30
विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाणारी भविष्य निर्वाह निधी (पीएम) आणि उपदानाची रक्कम ...
विलास गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाणारी भविष्य निर्वाह निधी (पीएम) आणि उपदानाची रक्कम वर्षभरापासून एसटीने ट्रस्टकडे जमा केलेली नाही. ९० हजार कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम १५०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. परिणामी ट्रस्ट अडचणीत येऊन कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी व उपदानबाबत (ग्रॅच्युइटी) व्यवहार पाहण्यासाठी एसटीचा एक स्वतंत्र ट्रस्ट आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यात अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांची तर, अर्धी महामंडळाची जमा होते. या रकमा ट्रस्टकडे जमा करण्यात आलेल्या नाहीत. जेवढी अधिक रक्कम जमा होईल, तेवढे ट्रस्टला अधिक व्याज मिळेल. याचा लाभ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो. मात्र, महामंडळाने ही रक्कम थकविली आहे.
ट्रस्ट अडचणीत
सरकारकडून प्रत्येक महिन्याला उशिरा मिळणाऱ्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीतून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागविला जात आहे; परंतु त्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाची रक्कम ट्रस्टकडे जमा केली जात नसल्याने ट्रस्ट अडचणीत येऊ शकते.
सरकारचा चार वर्षे मदतीचा शब्द; पण...
• कर्मचाऱ्यांचे वेतन आणि एसटीच्या खर्चाला लागणारी रक्कम चार वर्षे देण्याचे त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते; परंतु हाnसरकारने सवलत मूल्य रक्कम तोडून तोडून न देता अॅडव्हान्स म्हणून द्यावी. वर्षभराची साधारण ४४०० कोटी रुपये इतकी रक्कम आगाऊ दिल्यास अनेक आर्थिक प्रश्न निकाली निघतील.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
शब्द पाळला गेला नाही. सध्या केवळ सवलत मूल्य
• प्रतिपूर्ती रक्कम तोडून-तोडून देण्यात येत आहे. या रकमेवरील मिळणारे व्याज बुडत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.