राज्यात एकाच दिवसात परतले १५ हजार कर्मचारी; २० हजार कर्मचारी अजूनही संपात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:25 PM2022-04-19T12:25:15+5:302022-04-19T12:26:12+5:30
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाउननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.
मुंबई: गेल्या पाच महिन्यांपासून सुरू एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने गाड्या वाढल्या आहेत. सोमवारी तब्बल १५ हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आज एकूण उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या ६१,६४७ झाली असून २० हजार कर्मचारी अद्यापही संपात आहेत. दरम्यान ११ हजार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाउननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू होता मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानंतर कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अजूनही २० हजारांवर कामगार रुजू झालेले नाहीत. त्यांच्याकडे केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
दिनांक रुजू झालेले कर्मचारी
७ एप्रिल ११४
८ एप्रिल ५३
९ एप्रिल ७४३
१० एप्रिल ३६१
११ एप्रिल ५५७
१२एप्रिल १,५६९
१३ एप्रिल १,४०३
१४ एप्रिल १,२४३
१५एप्रिल १,५६१
१६ एप्रिल १,८७५
१७ एप्रिल १,५६४
१८ एप्रिल १५,१८५