पॉलिटेक्निकच्या १५ हजारांवर जागा रिक्त राहणार

By admin | Published: July 4, 2016 08:04 PM2016-07-04T20:04:01+5:302016-07-04T20:04:01+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थिती फारच खराब झाली आहे. प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ ३७ टक्के अर्ज आले असून १५ हजारांवर जागा रिक्त राहण्याचा धोका आहे

15000 seats of polytechnic will remain vacant | पॉलिटेक्निकच्या १५ हजारांवर जागा रिक्त राहणार

पॉलिटेक्निकच्या १५ हजारांवर जागा रिक्त राहणार

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ४ : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थिती फारच खराब झाली आहे. प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ ३७ टक्के अर्ज आले असून १५ हजारांवर जागा रिक्त राहण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांचा निरुत्साह कायमच राहीला. दरम्यान फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने जागा कशा भरावा असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर उभा राहिला आहे.


पॉलिटेक्निकच्या प्रवेशप्रक्रियेला १८ जून रोजी प्रारंभ झाला. परंतु सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. प्रवेशप्रक्रियेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० जून ही होती. मात्र विद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहता प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत ४ दिवसांनी वाढवण्यात आली होती.

नागपूर विभागातील सर्व ६९ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २५,२८५ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आतापर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत केवळ ९,३०० अर्ज आले आहेत व याची टक्केवारी काढली असता ती अवघी ३७ टक्के आहे. त्यामुळे यंदा विभागात १५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी अखेरच्या दिवशी शेवटच्या २ तासांत २०० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले.

Web Title: 15000 seats of polytechnic will remain vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.