लॉकडाऊनमध्ये १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:18 AM2020-07-18T02:18:11+5:302020-07-18T02:18:34+5:30
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती.
नागपूर : शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला. विविध तणावांमुळे लॉकडाऊनच्या दोन महिन्यातच अमरावती विभागातील १५१ शेतकºयांनी आत्महत्या केली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यातच अमरावती विभागात १५१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यातील १९ प्रकरणे नियमानुसार मदतीसाठी पात्र ठरली तर ३६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ११ प्रकरणांतच आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली. दरम्यान, जानेवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागातील ३८७ शेतकºयांनी आत्महत्या केली.
यवतमाळमध्ये सर्वाधिक संख्या
लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त ५४ शेतकरी आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. तर अमरावतीमध्ये ही संख्या ४० इतकी होती. अकोल्यामध्ये सर्वात कमी १३ आत्महत्या नोंदविण्यात आल्या.
४१ महिन्यांत साडेतीन
हजारांहून अधिक आत्महत्या
दरम्यान, २०१७ ते मे २०२० या कालावधीत विभागात एकूण ३ हजार ५५८ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील १ हजार ७५० म्हणजेच ४९.१८ टक्के प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. तर प्रत्यक्षात त्यातील १ हजार ६५७ शेतकºयांच्या कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्यात आली.