माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या 151
By admin | Published: August 6, 2014 01:56 AM2014-08-06T01:56:30+5:302014-08-06T01:56:30+5:30
माळीण गावावर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या सातव्या दिवशी ढिगा:याखालून आणखी 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले अ
Next
घोडेगाव : माळीण गावावर डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या सातव्या दिवशी ढिगा:याखालून आणखी 1क् मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 151वर पोहोचली आहे. एकूण 152 लोक ढिगा:याखाली गाडले गेले असल्याचा अंदाज प्रशासनाने काढला आहे.
या दुर्घटनेतून वाचलेले ग्रामस्थ व नातेवाईक यांत्याकडून माहिती घेऊन प्रशासनाने डोंगराच्या ढिगा:याखाली गाडले गेलेल्यांची यादी निश्चित केली आहे. माळीण गावठाण व सात वाडय़ावस्त्या धरून येथील लोकसंख्या 7क्4 होती. या पैकी 182 लोक माळीणमध्ये राहत होते. तर, बाहेरून गावात आलेले 8 जण होते. यातील 38 लोकांना वाचविण्यात आले असून उर्वरित 152पैकी 151 लोकांचे मृतदेह सापडल्याचे प्रांत अधिकारी डी. बी. कवितके, गटविकास अधिकारी विवेक इलमे व ग्रामस्थांनी एकत्र बसून निश्चित केले आहे. मंगळवारी दुपारी तीननंतर गावाच्या मागच्या बाजूला ढिगा:याखाली गाडली गेलेली असलेल्या झांजरे, लेंभे कुटंबीयांची पाच ते सहा घरे उकरण्यात आली. यामधून सर्वात जास्त 16 मृतदेह आढळले. मृतदेह अतिशय सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.
अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी येथील ग्रामस्थ, नातेवाईक व लहान मुलांचे कौन्सिलिंग करण्याची गरज आहे असे सुचविले होते. त्यानुसार पुणो येथून डॉ. मिलिंद भोई व त्यांची चार डॉक्टरांची टीम माळीणमध्ये आली होती. आसाणो आo्रमशाळेत माळीणचे ग्रामस्थ राहात असून येथे हे मानसोपचारतज्ज्ञ मुले, नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनावर आलेला ताण कमी करण्याचे काम करणार आहेत. मात्र ग्रामस्थांच्या मनात मृतां विषयीच्या आठवणी कायम असल्याचे चित्र आहे.
जी माती आम्ही हाताने खोदून शेती केली, ज्या मातीची आम्ही पूजा केली, त्या मातीने आम्हाला धोका दिला आहे, माळीणची जमीन शापित झाली आहे, त्यामुळे येथे आम्हाला राहायचे नाही, आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सुहास झांजरे या युवकाने व्यक्त केली.