१५५ शेततळ्यांचे काम पूर्ण, शेतक-यांचा प्रतिसाद वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:49 AM2017-08-03T03:49:50+5:302017-08-03T03:49:51+5:30
विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान जमीन धारण क्षेत्राची अट शिथिल केल्याने शेतकºयांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात १५५ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७३३ शेतकºयांच्या अर्जांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. तालुकास्तरीय समितीने छाननी करु न एकूण २७५ अर्जांना मंजुरी दिली असून तसे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त कामांपैकी ३० जून २०१७ अखेर १५५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यासाठी एकूण ६८ कोटी ४८ लाख रु पयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील निधी संबंधित शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस. पद्धतीने जमा करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व शेतकºयांची जमीनधारण क्षमता अत्यल्प असल्याने या योजनेंतर्गत ०.६० हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट शिथिल करु न ती ०.०२ हेक्टर करण्यास २० मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना त्याचा लाभ होत आहे.