15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल, श्रीगोंदा येथून सुरूवात तर नाशिकला समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 06:48 PM2018-02-13T18:48:53+5:302018-02-13T18:49:48+5:30

विदर्भ व मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरूवार दि.15 फेब्रुवारीपासून उत्तर महाराष्ट्र विभागात हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे.

From 15th February onwards, NCP's in North Maharashtra started from Attackball, Shrigonda and concluded Nashik | 15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल, श्रीगोंदा येथून सुरूवात तर नाशिकला समारोप

15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल, श्रीगोंदा येथून सुरूवात तर नाशिकला समारोप

Next

मुंबई : विदर्भ व मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरूवार दि.15 फेब्रुवारीपासून उत्तर महाराष्ट्र विभागात हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. सात दिवसांच्या या झंझावती दौर्‍यात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यात 21 सभा होणार असून दहा मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या उपस्थितीत नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील या दौर्‍याचा समारोप होणार आहे. 

 राष्ट्रवादी काँग्रेसने डिसेंबर महिन्यापासून राज्यभरात हल्लाबोल यात्रा सुरू केली आहे. 1 ते 11 डिसेंबर या काळात विदर्भात पदयात्रा केल्यानंतर जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दहा दिवसात 27 सभांनी संपुर्ण मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पिंजुन काढला होता. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता पक्षाने उत्तर महाराष्ट्रात आपले हे आंदोलन सुरू केले असून, त्याचा शुभारंभ गुरूवार दि.15 फेब्रुवारी रोजी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथुन सुरू होत आहे. 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या सात दिवसांत उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात 21 सभा होणार असून, समारोप नाशिक येथे 10 मार्च रोजी होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते अरूण गुजराती, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक, विद्यार्थी, विविध आघाड्यांचे प्रमुख आमदार, खासदार, सेलचे प्रमुख व पक्षाचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. 

गुरूवार दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रीगोंदा, दुपारी 4 वाजता शेवगांव, सायंकाळी 7.30 वाजता राहुरी, शुक्रवार दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अकोले, सायंकाळी 4 वाजता कोपरगांव, सायंकाळी 7 वाजता येवला, शनिवार दि.17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निफाड, दुपारी 2 वाजता दिंडोरी, सायंकाळी 5 वाजता कळवण, रविवार दि.18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता साटाणा, सायंकाळी 4 वाजता नवापुर, सायंकाळी 7 वाजता शहादा, सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर, दुपारी 3 वाजता चोपडा, सायंकाळी 6 वाजता पारोळा, मंगळवार दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रावेर, दुपारी 3 वाजता बोदवड, सायंकाळी 6.30 वाजता जामनेर, बुधवार दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता धरणगांव, दुपारी 3 वाजता पाचोरा व सायंकाळी 7 वाजता चाळीसगांव येथे जाहिर सभा होणार आहेत. 

राज्यातील शेतकर्‍यांना जाहिर कर्जमाफीचा अद्याप न मिळालेला लाभ, बोंडअळी, तुडतुड्या रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, दोन दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीचे झालेले नुकसान, वाढती महागाई, बेरोजगार, युवकांचे प्रश्न राज्यातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था, उत्तर महाराष्ट्रातील विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी मांडणार आहेत. 

 

Web Title: From 15th February onwards, NCP's in North Maharashtra started from Attackball, Shrigonda and concluded Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.